औसा न.प.च्या अडीच कोटीच्या निविदा वादात..बाद कंत्राटदार उच्च न्यायालयात दाद मागणार

*औसा न.प.च्या अडीच कोटीच्या निविदा वादात..बाद कंत्राटदार उच्च न्यायालयात दाद मागणार*










औसा (प्रतिनिधी) न.प.औसा मार्फत जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी अंतर्गत एकुण 3 निविदा  एप्रिल 2023 मधे काढण्यात आल्या  होत्या  ज्याचे अंदाजपत्रकीय रक्कम हे 1कोटी, 90 लक्ष, 70 लक्ष इतके आहे,यासाठी एकुण 05 निविदाधारकांनी सहभाग नोंदविला होता, ज्यामधे तपासणीअंती नप ने 3 निविदा धारक यांना कागदपत्रा अभावी रद्द करुन, 2 निविदाधारक हे अंतीम केले आहेत.सदरच्या बाद निविदाधारकानी नप वर हरकत घेत त्यांच्या निविदा ह्या जाणीवपुर्वक रद्द करण्यात आल्याच्या आरोप नप वर केला आहे ज्यामधे कंत्राटदार अझर शेख व श्री रोहन मुंढे यांचा समावेश आहे.

निविदाधारक कंत्राटदार श्री अझर शेख यांच्या म्हणण्यानुसार

न.प औसा यांनी त्यांची ई-निविदा रद्द करण्याचे कारण असे दाखवले आहे की,'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी चे चलन जोडले आहे व पावती जोडली नाही व चलन ही एकाच दिवशी काढणयात आले आहे' परंतु

निविदामधे अशी अट (कलम25 फ) होती की  "ई पी एफ नोंदणी प्रमाणपत्र जोडावे, व ते चालु वर्षा पर्यतचे निधी शुल्क भरणा केलेले असावे" परंतु नपने निविदा अटी मधे असे कधी म्हंटले नाही की "चलन व शुल्क हे एक दिवसात भरू नये" पुढे असे ही त्यांनी म्हंटलय की चलन भरल्याची खात्री हे नप पण EPF क्रमांक हे EPF च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करु शकले असते तेथे सर्व काही शुल्क भरलेले दिसते,

तरी परंतु शासन निर्देशात असे कुठे ही नाही की EPF अभावी निविदा रद्द करावी, तसेच चलन किवा शुल्क या क्षुल्लक कारणा अभावी तर मुळीच नाही.

तसेच न.प ने  पात्र केलेले निविदा धारक एस एस कन्स्ट्रकशन, औसा यांचे  ही EPF हे एकाच दिवसात भरलेले असताना न.प ने ते अपात्र केले नाही.

 कंत्राटदार श्री शेख यांना न.प ने दिलेल्या दि  23.05.2023 च्या नोटीसीत EPF चा उल्लेख/त्रुटी नसतानाही, त्यांच्या  निविदा, त्यांच्याकडुन चलन व पावती न मागविता रद्द करण्यात आली आहे जे की नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे.

तसेच निविदा अटी मधे EPF प्रमाणपत्रासोबत चालु वर्षाचे निधी भरलेले असावे अशी अट आहे पण चालु आर्थिक वर्ष  2023-24 हे एप्रिल 2023 पासुन सुरु होते व सदरील निविदा ही पण एप्रिल 2023 मधेच निघाली होती त्यामुळे नमुद केलेल्या अटीनुसार चालु वर्षाचे निधी भरता येणे ही शक्य नव्हते. वरील सर्व बाबींचा विरोध होईल म्हणून दिनांक 6 जून 2023 रोजी न प औसा मार्फत एकाच दिवशी तांत्रिक आणि आर्थिक लिफाफा उघडण्यात आला जे की नियमानुसार करता येत नाही.

तसेच न प औसा यांनी निविदा रद्द करण्याचे दुसरे कारण असे दाखवले आहे की 'नंतरची योग्यता'  याचे अर्थ काय असे न प औसा यांना विचारले असता "तुल्यबळ काम" असे सांगण्यात आले, तरी याचे उत्तर  न प औसा यांना दिनांक 29/5/ 2023 च्या पत्रामध्ये याचा खुलासा दिला होता की ही निविदा छोट्या छोट्या कामांचा समावेश करून एकत्रित करण्यात आलेली आहे ज्या सगळ्यांचे अंदाजपत्रक व शेड्युल बी वेगवेगळे आहेत, तरीसुद्धा न प औसा यांनी तक्रारदार निविदाधारक कंत्राटदार याना अपात्र केले आहे.

ज्यांना ई निविदा मिळाली आहे ते एस एस कन्स्ट्रकशन आणि  अनम कन्स्ट्रकशन या दोघांचीही बीड कॅपॅसिटी व इतर कागदपत्र बनावट आहेत याची तक्रार मी न प औसा यांना दिनांक 29/ 5 /2023 रोजीच्या पत्रात दिली होती तरीसुद्धा नप ने त्यांना तांत्रिक दृष्ट्या पात्र केले आणि विना स्पर्धा इ निविदा त्यांना देण्यात आली.

तरी इ निविदा ही स्पर्धात्मक व्हावी यासाठी ठेवण्यात येते पण असे जर शुल्लक कारणावरून निविदा धारकांना स्पर्धेतून बाद करत असल्यास कामात स्पर्धाच होणार नाही व यामुळे शासनाचा बराच नुकसान होणार आहे, जसे न प औसा यांनी तक्रारदाराची  कमी दराची  निविदा  रद्द करुन, अंदाजपत्रक दराप्रमाणे (ज्यादा दराने) निविदा देण्यात आली आहे, ज्याचा अर्थ असा की नप ने ही निविदा मॅनेज करून दिलेली आहे, तरी याबद्दल कंत्राटदार निविदाधारक श्री अझर शेख हे न प औसा यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहेत असे त्यानी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments