अजीम हायस्कूलच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम,९१.५८ टक्के निकाल.
संस्थेच्या वतीने सत्कार,६५ विद्यार्थी विशेष प्राविण्यात.
औसा (प्रतिनिधी) येथील अजीम हायस्कूलने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा ९१.५८ टक्के निकाल लागला.यात परवेज शेख व श्रेयस नलगे या दोघांनीही ९७.४० टक्के गुण घेवून सर्वप्रथम आले.तर प्राजक्ता बनसोडे ९७ टक्के घेवून द्वितीय,बेनझीर शारवले ९६.८० टक्के घेवून तिसरी आली आहे तर अमान शेख 93.60 टक्के घेवून पाचव्या स्थानी आला.६५ विद्यार्थी विशेष प्राविण्यात,तर ८७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. अफसर शेख,संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी,प्राचार्य निजामोद्दिन शेख,सुलेमान शेख,श्रीमती परवीन शेख,दानिश शेख,टी.एम.शेख,बी.सी.केसरे,डॉ. खलील सिध्दीकी,हाकीम सय्यद, आसेफ शेख आदींनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




.jpg)


0 Comments