छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध मान्यवरांचा सत्कार

 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने

गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध मान्यवरांचा सत्कार






सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्वासाठी नाही तर रयतेसाठी स्वराज्य उभा केले होते म्हणूनच धर्मातील मुहूर्त ऐवजी शेतकऱ्यांचा दृष्टीने महत्त्वाचा असलेलं मृग नक्षत्र राज्याभिषेकासाठी निवडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आपण सारे पुढे घेऊन जाऊ असे मत शहराध्यक्ष सुर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने मराठा सेवा संघ नुतन शहराध्यक्ष सुर्यकांत पाटील यांच्या सह गुणवंतांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंती ते बोलत होते.

नुकत्याच पोलीस खात्यातून सेवा निवृत्त झालेले पोलीस सुर्यकांत पाटील यांची मराठा सेवा संघाच्या नुतन शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व नुकत्या दहावीच्या परीक्षा निकाल लागला असून त्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ लक्ष्मी मार्केट येथील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी दहावी परीक्षेत उल्लेखनीय गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेले जुबेर बागवान, अयान फेरोज बागवान व समाजसेवक इक्बाल बागवान यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छ. शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहर अध्यक्ष मतीन बागवान, खालीद पंजाबी, जाकीर नाईकवाडी, मुजीब खलीफा, राम गायकवाड, पोपट भोसले, संजय शिंदे, राजू हुंडेकरी, अमजद पठाण, अय्युब बागवान, जावेद बद्दी, रिजवान शेख, हजरत वागरदरीकर, फेरोज वागदरीकर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम गायवाड यांनी केले तर आभार अशपाक बागवान यांनी मानले.


फोटो ओळी मराठा सेवा संघाचे नूतन शहर अध्यक्ष सुर्यकांत पाटील यांचा सत्कार करताना हाजी मतीन बागवान, राम गायकवाड, जाकीर नाईकवाडी, संजय शिंदे, जावीद बद्दी, राजु हुंडेकरी, अशफाक बागवानसह दहावी परीक्षेत यशस्वी झालेले गुणवंत विद्यार्थी.






Post a Comment

0 Comments