औशात चक्क मटका जुगारांची पत्रके वाटून केला जातो जनजागृती शहरात खळखळ,पोलिसांच्या कामगिरीवर संशय

 औशात चक्क मटका जुगारांची पत्रके वाटून केला जातो जनजागृती 


शहरात खळखळ,पोलिसांच्या कामगिरीवर संशय







औसा

सुफी-संताची भुमी असलेल्या शहरात बोकाललेल्या अवैध्यधंद्यांनी कळस केला. आता तर चक्क मटक्याच्या ठिकाणाची माहिती पत्रकात छापून ते शहरात वाटण्यात आली.यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून बंदी असतानाही बेकायदेशीर धंद्यांची जाहिरात होते.सदरची बाब पोलिसाच्या कर्तव्यावर संशय घेणारी आहे.  


 शहरातील बसस्थानक परिसरासह औसा टि पाईंट इतरत्र  पत्रक वाटण्यात आले.यासह काही ठिकाणी वर्तमानपत्रासहही हे पत्रक आले.वाचकांनी कुतुहलाने वाचन केले असता शहरातील १७ ठिकाणी कल्याण व मिलन डे नावाचा मटका हा जुगार खेळला व खेळविला जातो.अशी माहिती होती.शेवटी याला अभय कोणाचे हा ही उल्लेख होता.म्हणजेच पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धुळ टाकून हा व्यवसाय दुकाने थाटून खेळविला जातो.त्याची माहिती यातून देण्यात आल्याचे बोलले जाते.यापूर्वी शहरात असा प्रकार कधीही घडला नसल्याने दिवसभर याची चर्चा होती.पण हा प्रकार निंदनीय असून आधीच युवापिढी व्यसनाच्या आहारी जाते.त्यात सबंधितांकडून याला अभय मिळत असेल तर समाजात व्यसनासह गुन्हेगारी वाढेल,याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होते.


पोलिस अधिक्षकांच्या भुमिकेकडे लक्ष

-----------------^------------^

आपल्या उत्कृष्ट कार्याने चर्चेत असणारे पोलिस अधिक्षक मटक्याच्या विरोधात आहेत.पण औशातील हा प्रकार पाहता ते काय भुमिका घेतील,याकडे लक्ष लागले.

Post a Comment

0 Comments