*लामजना येथील आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी*
*शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या कुशल नेत्रतवाखली*
आज औसा तालुक्यातील लामजना येथे- शिवसेना उप जिल्हा प्रमुख बजरंग दादा जाधव यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन
- शिवसेना वर्धापन दिन व शिवसेना नेते युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री.रोहीदासजी चव्हाण साहेब, व औसा तालुक्याचे माजी आमदार दिनकरराव माने साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख तानाजी सुरवसे यांच्या पुढाकाराने संपूर्ण औसा तालुक्यात हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून लातूर जिल्हा शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सूचनेवरून औसा तालुक्यातील 105 गावामधे आरोग्य चिकित्सा, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत. आज १४ जुलै रोजी लामजना या गावात आरोग्य चिकित्सा व नेत्र चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. लामजना येथील या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बजरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
.यावेळी लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या टीमचे डॉ.रवींद्र चव्हाण ,डॉ. शरद चव्हाण ,डॉ. शुभम भोसले हे सर्व डॉक्टर्स व त्यांची टीम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य व नेत्र तपासणी शिबाराबद्धल तालुका प्रमुख तानाजी सुरवसे माहिती देत असताना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिदोरी घेऊन शिवसेना ही जन सामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे कसलीही मोठी नैसर्गिक आपत्ती असेल अतिवृष्टी असेल भूकंप असेल वादळ असेल अशा परिस्थितीमध्ये मदतीसाठी सर्वात अगोदर धावून जाणारा हा शिवसैनिकच आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये रक्ताची जर गरज पडली तर स्वतःचे रक्त देण्यासाठी पुढे येणारा हा शिवसैनिकच आहे म्हणून आज सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेवरती तेवढाच विश्वास आहे वेळेप्रसंगी आम्ही रक्त देऊ शकतो आणि सामान्यांसाठी रक्त सांडूही शकतो सामान्यांच्या प्रश्नासाठी झगडणारी संघटना आहे आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या भावनेतून या संपूर्ण तालुक्यामध्ये जनसामान्यांची सेवेसाठी या शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी तालुक्यातील जनतेने सदर आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केले ,बजरंग जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले,सूत्र संचलन व आभार प्रदर्शन माजी तालुका प्रमुख श्री संजय भाऊ उजळंबे यांनी केले.
तसेच या शिबिरामध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी या सर्व तपासण्या होऊन त्याच ठिकाणी नागरिकांना औषध उपचार देण्यात आले.
यावेळी औसा विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, शिवसेना तालुकप्रमुख तानाजी सुरवसे, अल्प संख्यांक सेल चे तालुकाप्रमुख सलीम पटेल, तालुका समन्वयक संतोष सूर्यवंशी, युवा सेना तालुका प्रमुख महेश सगर, लामजना गावचे सरपंच खंडेराव फुलारी, उप सरपंच बालाजी पाटील, ज्ञानेश्र्वर चिल्ले, नजीर पटेल, पापामिया पटेल, राम पवार, संतजी होळकर, बाबू सावकार, अजित साठे, विनोद कारभारी, माजीद उस्मानी, महादेव गिरी, उत्तम बिराजदार, युनूस कारभारी, नूर कारभारी, बुद्धिवंत शिंदे, बाबू कांबळे, सुधाकर मुगळे, ऋषिकेश माळी, बालाजी कांबळे, सुरज साठे, मिराज पटेल, नजीर पटेल,शिवसैनिक गावकरी उपास्थित होते.
---
0 Comments