आझादचे विद्यार्थी होणार कौशल्य निपुण*

*आझादचे विद्यार्थी होणार कौशल्य निपुण*




औसा_दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रशिक्षीत मनुष्यबळाची मागणी पाहता बेरोजगार युवक युवतीना मोफत प्रशिक्षण व नौकरी अथवा स्वयंरोजगाराची आवश्यकता लक्षात घेऊन प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध कोर्सेस चालू करण्यासाठी हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी औसा संचलित आझाद महाविद्यालय औसा व समर्थ एज्युकेशनल फाऊंडेशन सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून या करारानुसार आझाद महाविद्यालय औसा येथे फूड प्रोसेसिंग,सीसीटीव्ही टेक्निशियन, होम अप्लान्सेस टेक्निशियन, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह,मल्टी स्किल टेक्निशियन हे तीन ते पाच महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत.या कोर्सेससाठी केवळ १०वी उत्तीर्ण आवश्यक असून त्यांच्या सत्यप्रतीवर प्रवेश घेता येतो,तसेच आपले नियमित शिक्षण घेत कोर्स पूर्ण करता येतात.हे सर्व कोर्सेस मोफत स्वरूपात शिकवले जाणार आहेत.यामध्ये प्रात्यक्षिकावर जास्त भर राहणार आहे.कोर्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नौकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालया तर्फे मिळणाऱ्या या प्रमाणपत्राच्या आधारे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन ते पाच लाखापर्यंत कर्ज सुविधा मिळणार आहे.या करार प्रसंगी संस्था सचिव डॉ.अफसर शेख प्राचार्य डॉ.ई.यु मासूमदार,उपप्राचार्य टी.ए जहागीरदार,सुलेमान शेख,प्रा.डॉ डी.डी क्षीरसागर,प्रा.डॉ आर.व्ही सूर्यवंशी, प्रा.डॉ एस.के लदाफ. समर्थ एज्युकेशनल फाऊंडेशन सोलापूर चे अध्यक्ष प्रा.सत्यम दुधनकर, समन्वयक कृष्णा मैंदरकर उपस्थित होते.आज तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे हे बदल आत्मसात करून भविष्यातील रोजगार उपयोगी कौशल्य प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सेसना प्रवेश घ्यावा असे आवाहन हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ई.यु  मासूमदार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments