राज्यस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव 2024 मध्येसोलापूर जि.प. व म.न.पा. शाळांना तिसऱ्या व सातव्या क्रमांकाचे पारितोषिक


राज्यस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव 2024 मध्ये 
सोलापूर जि.प. व म.न.पा. शाळांना तिसऱ्या व सातव्या क्रमांकाचे पारितोषिक.

सोलापूर- ॲमेझाॅन फ्युचर इंजिनियर, लिडरशीप फॉर इक्वीटी व कोड टू इन्हास लर्निंग या तीन संघटनांच्यावतीने पुणे येथे राज्यस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धा महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी कोडींग व मशीन लर्निंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण १४ शाळांची निवड झाली होती. सोलापूर जिल्ह्यातून दोनच शाळा सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळवंचीला राज्यात तिसरा क्रमांक व मनपा मुलांची उर्दू शाळा क्रं. दोन सोलापूरला राज्यात सातवा क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे पारितोषिक म्हणून तिसऱ्या क्रमांकाला दोन लॅपटॉप, पाच टॅब व 3000 रोख रक्कम तर सातव्या क्रमांकाला एक लॅपटॉप, तीन टॅब व 2000 रोख रक्कम देण्यात आली. या स्पर्धेत गुळवंची शाळेच्या शिक्षिका राजश्री माने व मनपा मुलांची उर्दू शाळा क्रं. दोनचे शिक्षक इम्रान जमादार हे प्रत्येक शाळेतून तीन विद्यार्थ्यांसह सहभागी झाले होते. सदर पारितोषिक विजेत्या शाळेमध्ये शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना संगणकातील कोडींग व मशिन लर्निंगचे ज्ञान देणार आहेत.
सदर उत्सवामध्ये गुळवंची शाळेने अंध व्यक्तींकरिता स्मार्ट काठी तर मनपा उर्दू शाळेने ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टमची कोडींगद्वारे रचना केली होती. या तीन दिवसीय हॅकेथॉन उत्सवामध्ये राज्यातील 14 शाळा सहभागी होत्या जिल्हास्तरीय कोडींगमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संधी देण्यात आली होती. सदर कार्यक्रम ॲमेझॉनचे ऑफीस विमाननगर, पुणे येथे आयोजित केले गेले होते. 
या यशाबद्दल राजश्री माने मॅडम, इम्रान जमादार सर व विद्यार्थी यांचे मा.प्रशासनाधिकारी संजय जावीर साहेब, उत्तर तालुका गटशिक्षणाधिकारी निंबर्गी साहेब, डायटचे अधिव्यक्ता शशिकांत शिंदे सर, जि.प. विस्तार अधिकारी दफेदर सर व दवलतबी नदाफ मॅडम, मनपा पर्यवेक्षीका रजनी राऊत मॅडम व निलोफर सय्यद मॅडम, केंद्रप्रमुख हरगुडे सर व संतोष जाधवर सर, मुख्याध्यापक सोनवणे सर व सलेहा शेख मॅडम व स्टाफ यांनी अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments