बसवराज पाटीलसाहेब तुमच्या बचावात्मक आणि सावधगिरीच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा परंतु....

बसवराज पाटीलसाहेब तुमच्या बचावात्मक आणि सावधगिरीच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा परंतु

लक्षात ठेवा साहेब, ज्या पक्षांने तुम्हाला एवढं भरभरून दिलं त्या पक्षाला आपण काय दिले ,आज पक्ष अडचणीत असताना आपण ही भूमिका घेतली ? पुरोगामी महाराष्ट्रामधील लोकशाहीची जपणूक करणारा दलित, मातंग, अल्पसंख्यांक त्यांच्या बाजूचा एक नेता म्हणून आपली ओळख होती आणि आम्हालाही आपला आदर होता, परंतु आपण तर लोकशाहीवर घाला घालणाऱ्या हुकूमशाही विचारधारेचे समर्थन करण्याच्या साठी आणि जपणूक करण्यासाठी आपण भाजपमध्ये गेलात ही बाब प्रामाणिकपणे, आणि महापुरुषांच्या विचारधारेवर, लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला अस्वस्थ करणारी आहे असो, तुम्ही जे करार केलेत त्याबद्दल शुभेच्छा 🙏
साहेब आपण एक गोष्ट साबित केली की, आपण स्वच्छ आणि निष्कलंक राजकीय चारित्र्य संपन्न असणाऱ्या मा शिवराज पाटील साहेबांचे मानसपुत्र म्हणून असणारी तालुक्यामध्ये जी ओळख होती ती नष्ट झाली कारण आपण देखील त्याच यादीत जाऊन बसलात की ज्यामुळे प्रामाणिक आणि इमानदार माणसांचा विश्वास आपल्या राजकीय चारित्र्यावरचावरचा उडालेला आहे, आपण जर स्वच्छ असता तर भाजप च्या दबावाला आपण भीला नसता, 
     परंतु ही गोष्ट सत्य आहे या मतदारसंघातला मुस्लिम दलित आणि मातंग आपल्या सोबत कधीच असणार नाही तो ताकतीने आपल्या विरोधात एवढ्यासाठीच असेल की, या देशातली एकात्मता आणि अखंडता, या देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर असणारी ही सामान्य देशभक्तांची श्रद्धा आपल्या सोबत कधीच असणार नाही
  म्हणून आपण जे भाजपवासी झाला ते एका अर्थाने बरेच झाले या तालुक्यातील काँग्रेस श्वासमुक्त झाली
     असो परत
 तुम्हाला , तुमच्या राजकुमाराला आणि तुमच्या लक्ष्मणाला शुभेच्छा🙏🌹

Post a Comment

0 Comments