राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका सचिव पदी संजय पवार तर तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष पदी जुबेर शहा यांची नियुक्ती तसेच नळदुर्ग शहराध्यक्ष अब्दुल रहेमान यांचा सत्कार...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका सचिव पदी संजय पवार तर तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष पदी जुबेर शहा यांची नियुक्ती तसेच नळदुर्ग शहराध्यक्ष अब्दुल रहेमान यांचा सत्कार...



 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांचे जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या नेतृत्त्वाखाली व तुळजापूर-उस्मानाबाद- धाराशिव विधानसभा अध्यक्ष मलंग शेख व धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव तालुका सचिव पदी संजय हरिबा पवार तर तुळजापूर-उस्मानाबाद-धाराशिव विधानसभा उपाध्यक्षपदी जुबेर सय्यद शहा यांची नियुक्ती करण्यात आली.
धाराशिव तालुका सचिव पदी संजय हरिबा पवार व तुळजापूर विधानसभा उपाध्यक्षपदी जुबेर सय्यद शहा यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
धाराशिव तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेले संजय हरिबा पवार हे एक नावाजलेले उद्योजक असून समाजातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे कार्य त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून केले जात आहे.
तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुर गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्ह्यामध्ये बूथ कमिटी बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नळदुर्ग चे शहराध्यक्ष अब्दुल रहमान उर्फ अजित अण्णा जूनैदी यांनी एकूण 20 बूथ कमिट्या बनवून जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धूरगुडे यांच्याकडे सोपविण्यात आल्या. बूथ कमिट्या बनविल्याबद्दल जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने नळदुर्ग शहराध्यक्ष अब्दुल रहेमान यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
 यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग शेख, धाराशिव तालुका अध्यक्ष प्रशांत फंड, महीला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, नळदुर्ग शहराध्यक्ष अब्दुल रहेमान, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष महमंद अबुबकर कोतवाल, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब ननवरे,सुलोचना जाधव,धाराशिव शहर उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर, अल्पसंख्यांक धाराशिव शहराध्यक्ष अरफात काझी, अल्पसंख्यांक धाराशिव शहर कार्याध्यक्ष समीर खतीब, अंबेजवळगा जि.प गट प्रमुख सुरेश राठोड, समिर नदाफ, सतीश कानडे, अभिमन्यू पवार,किरण वाकुरे, लालासाहेब उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments