मुस्लिम संघर्ष विकास मोर्चा आणि बांधकाम कामगार संघटनेचा बजरंग बप्पा सोनवणे यांना जाहीर पाठिंबा
माजलगाव (प्रतिनिधी) - बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना मुस्लिम संघर्ष विकास मोर्चा तथा बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नवीदोद्दिन सिद्दिकी यांनी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील व माजी नगराध्यक्ष सहाल भैय्या चाऊस यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विनाशर्त जाहीर पाठिंबा दिला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
बजरंग बप्पा सोनवणे यांना दिलेल्या जाहीर पाठिंबा पत्रात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यातील बीड लोकसभा मतदार संघातून बजरंग (बप्पा) मनोहर सोनवणे यांना इंडिया महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आणायचे आहे. संस्थापक अध्यक्ष या नात्याने मुस्लिम संघर्ष विकास मोर्चा तथा बांधकाम कामगार मजूर संघटना व मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक मतांनी निर्णय घेऊन ही निवडणूक भारत देशाची निवडणूक असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे तरुण तडफदार नेते राहुल गांधी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे जाणते नेते शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व या सर्वांचे विचार समाजात रुजविण्यासाठी आणि जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना बीड लोकसभा मतदार संघासाठी निवडून देण्याचा निर्धार केला आहे. याकरिता बजरंग बप्पा सोनवणे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
0 Comments