‌गद्दारोंको माफ नहीं किया जाएगा - आप नेता संजय सिंह

‌गद्दारोंको माफ नहीं किया जाएगा -  आप नेता संजय सिंह 




महाराष्ट्र रिपोर्टर पॉलिटिकल न्युज ब्यूरो- कोल्हापूर-
कोल्हापूर येथे इंडिया आघाडीचे कोल्हापूर लोकसभा उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीची भव्य सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी आप नेते संजय सिंह बोलत होते. 
          कोल्हापूर  जिल्हा हा शाहू फुले आंबेडकर विचारांना पुढे घेऊन जाणारा म्हणून ओळखला जातो संबंध भारताला राज्याला शाहू महाराजांनी पुरोगामी विचाराने पुढे नेले जात धर्म भेदाभेद याला कदापि थारा या कोल्हापूर जिल्ह्याने दिले नाही आज संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी शाहू महाराजांच्या विचारांची गरज आहे राज्यातील सर्व पुरोगामी संघटनांनी महाराजांच्या उमेदवारीचा आग्रह केला शाहू महाराजांचा विजय निर्विवाद मोठ्या मताधिक्याने निश्चित आहे केवळ औपचारिकता बाकी आहे असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की मोदींच्या हुकूमशाही ला विरोध करणाऱ्याला जेलमध्ये आणि भ्रष्टाचाऱ्याला भाजपमध्ये मंत्री बनवले जाते . 
यावेळी या सभेसाठी कोल्हापूरकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments