आजही आम्ही मुक्कामग्रस्त आमच्या जुन्या पडक्या घराच्या जागेत जाऊन आमच्या नातेवाईकांना डोळ्यातील अश्रूंचा अभिषेक करत असतो. भूकंप नंतर हरवलेली मानवी मूल्य प्रेम जिव्हाळा माणुसकी बंधुभाव त्या ठिकाणी शोधत असतो.असतो30 सप्टेंबर 1993. तूर आणि तत्कालीन व 16 जिल्ह्यात महाविनाशकारी भूकंप झाला आज किल्लारी येथे काळा दिवस साजरा करण्यात येत आहे. भूकंपात मरण पावलेल्या मृतांनाआमची भावपूर्ण श्रद्धांजली.!!. भूकंपानंतर तत्कालीन केंद्र आणि राज्य सरकारने भूकंपग्रस्तांचे सर्व दृष्टिकोनातून पुनर्वसन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव. राष्ट्रनेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब. मुख्यमंत्री शरदराव पवार साहेब.तत्कालीन पालकमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब. औसा तालुक्याचे तत्कालीन आमदार किशनरावजी जाधव साहेब . तत्कालीन प्रशासन भूकंप पुनर्वसन सचिव जॉनी जोसेफ तसेच अनेक स्वराज्य संस्था.
ग्रामस्थ लोकप्रतिनिधी सर्व सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यातून भूकंपग्रस्त गावांची कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले. भूकंपात आपले नातेवाई गमावलेल्या अपग्रस्तंना सर्वतोपरी मदत करण्यात आली त्यांचे मानसिक संतुलन सुद्धा सुधारण्याचे प्रयत्न झाले वैद्यकीय सुविधा. सुरुवातीच्या कालावधीत मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा याची सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यवस्था करण्यात आली.. होती
भूकंपाच्या घटनेला आज 33 वर्षे पूर्ण झाली
आपण खरेच या दुर्घटनेतून काय शिकलो काय गमावलं याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. भूकंपापूर्वी सहा परिसर माणुसकी बंधुभाव आणि गावाचे गाव कोण घेऊन मिरवणारा होता वैभव होते माणुसकी होती समृद्धी होती ते भूकंप ने गमावले. कोणत्याही आधुनिक गोष्टीचा स्वीकार करणे एवढे चांगले तेवढेच वाईट. भूकंपग्रस्त भागात सिमेंटचे जंगली उभी राहिली. इथेच माणूस माणसाला विसरत चालला आहे आज ग्रामीण भागात सुद्धा पहा गावागावात सीमेची जंगले उभी राहत आहेत. सरकारकडून घरकुलासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि सिमेंटच्या जंगलामुळे उष्णतेचे प्रमाण कमी प्रमाणात वाढत असल्याचे तज्ञांना वाटते.काही पत्रकारांना माहित नाही ते म्हणतात किल्लारीचा भूकंप 1993. श्री गणेशाचे विसर्जन अर्थातच या अनंत चतुर्थीची पहाट. तीन वाजून 45 मिनिटे तत्कालीन धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आणि लातूर उस्मानाबादजिल्ह्यात महाविनाशकारी भूकंप झाला. श्री गणरायाचे विसर्जन करत असताना गणरायांनी या दोन जिल्ह्यात विनाशकारी भूकंप केला. ं श्री गणरायांना आपणास ठाऊक एवढा राग का आला होता. चे उत्तर अद्यापही मिळाले नाही. आपण दैनंदिन जीवनात जुन्या मंडळीकडून चर्चा ऐकण्यात येत असते की या पृथ्वीवर पाप जास्त झाले की असा येत असतो. ते काही असो मात्र या दोन्ही जिल्ह्यात अविनाशकारी भूकंप झाला दोन्ही जिल्ह्यातील
सुमारे गावात व त्यांचे नव्हते झाले. जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली . औसा शहरात त्या पहाटे श्री गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक चालू होती याबाबत औसा येथील माजी नगरसेवक तथा समाजसेवक सिद्धाराम दादा मिटकरी अधिक विस्तृतपणे वर्णन करू शकतात.
मिरवणूक शहरातील श्री महादेव मंदिर जात असताना अचानक कोणालाही काही कळाले नाही पळापळसुरू झाली याला हिंदीत तितर भीतरम्हणतात अशी पळू लागली. मिरवणुकीमध्ये औसा तालुक्याचे कर्तव्य तत्पर तत्कालीन तहसीलदार डॉ. ज्ञानोबा फुलारी आणि लातूरचे तसेच कार्यतत्पर जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी हे होते. तहसीलदार फुलारी महोदयांनी जिल्हाधिकाऱ्याची फोनवरून संपर्क साधला. चर्चा झाली जिलाधिकारी परदेशी महोदयांनी महाराष्ट्र शासनाची अर्थात मंत्रालयात संपर्क साधला तेव्हा भूकंप झाल्याचे स्पष्ट झाले. त्यादिवशी गणराया श्री गणराया आपल्या गावाला गेली मात्र जाताना त्यांनी या दोन जिल्ह्यातील हजारो स्त्री-पुरुषांना सोबत नेले असे म्हटले असता अतिशय ठरू नये. भूकंप झाल्याची खात्री पटली तत्कालीन मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांनी तत्कालीन कार्यततर प्रधानमंत्रीपीव्ही नरसिंह राम यांच्याशी संपर्क साधण्यात आला. केंद्र सरकारने तत्काळ सर्व अपत्य यंत्रणांना सक्रिय केले. सदर यंत्रणा पोहोचण्यापूर्वी औसा तालुक्याचे तत्कालीन कार्य तत्पर आमदार किसनरावजी जाधव हे किल्लरीत किंवा केव्हा पोहोचली होती. तसेच तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शेतीच काय करता येईल याची प्रयत्न चालू केले होते. संकट मोठे होते लोकांच्या ओरडण्याचे रडण्याचे गळ्चे
. हवाच ऐकू येत होते . प्रथम केंद्र आणि राज्य सरकार सह स्वयंसेवी संस्थांच्याकडून भूकंपातील जखमी आणि त्या काळात बहुसंख्य घरातील नातेवाईक भूकंपात गमावले होते त्यांच्यासाठी तात्काळ भोजन जापान यांच्या निवाऱ्यासाठी निवाऱ्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करणे सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली
कालावधी त कोणीही मी मोठा तु लहान किंवा किंवा मी क्लासवन अधिकारी कर्मचारी असा भेदभाव कोणाच्या मनात आला नाही सर्वांनी अगदी सर्व मानणारा धनाने सेवा केली. झाल्यानंतर प्रथम भूकंपातून जीवदान मिळालेल्या लोकांना तात्पुरता निवारा जेवणाची सोय औषधी आवश्यकते सुविधा पुरविण्यात येत होत्या. केंद्र सरकारने तात्काळ दखल घेऊन त्या परिसरात आणीबाणीची घोषणा केली आणि सगळ्यांचा यंत्रणाना कामाला लावले. संकट खूप मोठे होते. भूकंपामुळे हजारो घरे उध्वस्त झाली जीवित वित्तहानी झाली. पूर्वत सावरणे अत्यंत कठीण होते. तरीही सरकारने या कालावधीत कोणत्या गोष्टीची कमतरता वासू दिली नाही देशभरातील विविध सेवाभावी संस्था संत महात्मे डॉक्टर्स यांच्या संघटना समाजसेवक विद्यार्थी पत्रकार सर्वांनी त्या कालावधीत फार मोठे मोलाचे योगदान दिले. सुरुवातीच्या दिवसात भूकंपात सर्वसमावलेल्या व्यक्तींना आधार देणे सर्व दृष्टीने त्यांच्यात पुन्हा
विश्वास निर्माण करणे महत्वाचे होते. ते काम तशी तहसीलदार जिल्हाधिकारी कर्मचारी समाजसेवक ग्रामस्थ पोलीस निरीक्षक गृह रक्षक दल विद्यार्थ्यांसह सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले. त्यानंतर प्रधानमंत्री मुख्यमंत्री आधी सर्वांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागात भेट देऊन झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यात आला. भूकंपामुळे विविध वित्तमोठ्या प्रमाणात झाली होती. त्याच ठिकाणी पुनर्वसन करणे शक्य नव्हते म्हणून त्या परिसरातील ग्रामस्थ सरपंच सर्व जबाबदार घटक यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून भूकंपग्रस्ताचे भूसंपादन करून नवीन जागेत सेल्फी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले
या दुर्घटनेला आता सुमारे 35 वर्षीय होत आहे. भूकंपाच्या जखमा अद्याप ओल्या आहेत. भूकंपग्रस्त गावात ती व घरांची दुर्दशा दैन्यवस्था झाल्याचे दिसून येत आहे . भूकंपग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाल्यानंतर भूकंपग्रस्तांनी आपली जुनी घरे सोडून दिली. जुन्याओस पडलेल्या जागा वर राज्य सरकारने त्या जागांचा चांगल्या कामासाठी वापर करण्यात यावा शक्यतो त्या जागेवर पिकांची लागवड करता येईल काय फळांची झाडे लावता येतील काय. किंवा सोलार पॅनल सौर ऊर्जा संयंत्र येथील काय. याबाबत गांभीर्याने विचार करून पुढील काळात कार्यवाही व्हायला हवे.
मनुष्य या सर्व गावांच्या सर्व घरांची सर्व दृष्टीने पुनर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचे झाले तर शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औसा तालुक्यातील लिंबाळा (दाऊ) गाव कायमस्वरूपी पुनर्वसन केले. . तत्कालीन औसा तालुका शिवसेनाप्रमुख तथा झुंजार नेते प्रा. सूर्यभान जाधव सर यांनी भूकंपानंतर भूकंपग्रस्त गावात भागात भूकंपग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्याची मोलाचे प्रयत्न केले जिवाचे रान केले. शिवसेनाप्रमुखांनी भूकंपग्रस्त भागातील लोकांसाठी आवश्यक ती साहित्य स्वयंपाकाची भांडी टोवह. कपडे लते अगदी दंतमंजन टूथपेस्ट. पादत्राणे भूकंपग्रस्तांना दररोजचे जेवण तयार करून औसा येथून दररोज सकाळ संध्याकाळ वाहनाद्वारे पुरवठा करण्यात येत होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जी हवी होतै आपल्याच हाताने स्थापन केलेल्या शिवसेनेची सर्वार्थानेझालेली
मित्रहो !!
सजन हो. !!!
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे खरेच राजकीय तोडजोड करणारे नव्हते. त्यांच्या पश्चात शिवसेनेची झालेली मोडतोड पाहूनआदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गात निश्चित अश्रू आले असतील . बाळासाहेब वास्तवात अशी नव्हती हे इतरांच्या संकटात बाळासाहेब धावून जात असत. बाळासाहेबांनी संकट ग्रस्ताना सतत मदत केली. आश्रय दिला. आशीर्वाद दिले. मात्र निश्चित बाळासाहेब कुठे असो त्यांचा सच्चा शिवसैनिकावर आशीर्वादाचा हात पाठीवर थाप नेहमीच राहील. बाळासाहेब रडू गाणी गाणारे नव्हते तर रडक्यांचे डोळ्यांचे अश्रू पुसणारे होते.
असो असो राजकीय विषय. आगामी काळात विस्तृतपणे आढावा घेता येईल. शेवटी राजकारण हे मानव जातीच्या सर्वांना स्पर्श करणारा विभाग आहे.
मित्रहो सजन हो
शिवसेनेने त्या काळात भूकंपग्रस्त माणसांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. पिठाची चक्की शिवण यंत्र. छोटा मोठा व्यवसाय पाहण्यासाठी मदत केली. आज प्रा. सारखे जाधव सरांसारखे भूकंपाच्या संकटात आणीबाणीत काम केलेल्या जाधव सरासारख्या कार्यकर्त्यांना राज्य सरकारने पंपग्रस्त भागातील घरांच्या पुनर्दृष्टीसाठी मदत घ्यायला हवी. किमान निंबाळा(दाऊ )या गावातील घरांची दयनीय अवस्था झाली आहे दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मराठवाड्यातील अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून जाधव सरांना ओळखले जाते. सामाजिक क्षेत्रात त्यांचे खूप मोठे काम आहे.
औसा नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष हाजी एडवोकेट मुजिबोदीन पटेल साहेब माजी आमदार पूज्य मल्लिनाथ जी महाराज माजी आमदार शिवशंकर आप्पा उटगे साहेब. औसा येथील श्री सद्गुरू वीरनाथ मल्लिनाथ महाराज संस्थांचे चौथे पीठ अधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी शहरासह परिसरातील भूकंपग्रस्तांना मानसिक बळ दण्याचे
मोठे काम केले. या काळात ज्येष्ठ पत्रकार आणि आजही हक्काने भाऊजी आदरणीय जय प्रकाश जी दगडे साहेब पत्र महर्षी नारायणराव नाना हंचाटे. साहेब. ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर साहेब. देवगिरी तरुण भारतचे संपादक मनोहर कुलकर्णी. ज्येष्ठ पत्रकार जोशी साहेब लातूरकर सध्या सोलापूर येथे पत्रकारिता करतात. यांचे मोलाचे योगदान राहिले. वरील आदरणीय ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अशा काही निवडक पत्रकारा नी भूकंप काळात मार्गदर्शकाची भूमिका निस्वार्थपणे पार पाडले. तेव्हा मी आताही अशा ज्येष्ठांचा हातात एक गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्याचे धाडस शासनाला झाले नाही याचे दुःख वाटते. आणि त्या काळात निस्वार्थपणे कुठे पायी चालत कुठे बैल.गाडीत कुठे बैलगाडीत असा प्रवास केला. दगडे साहेब कुलकर्णी साहेब .अरविंदजोशी साहेब यांच्या आम्हाला मार्गदर्शन लाभले.
. प्रा. जाधव सरांना तत्कालीन औसा शहर शिवसेनाप्रमुख दिलीप भाऊ क्षीरसागर. राजकुमार सूर्यवंशी उर्फ आवटी. लिमकर. आदि शिव सैनिकांचे मोठे योगदान राहिले
या शिवसैनिकांचे मुलाचे सहकारी लाव ले सर्व शिवसैनिक यांनी या काळात रात्र दिवस परिषद घेतले. शासकीय स्तरावरून प्रथम भूकंपग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुणे वसंत करण्यासाठी सर्वांच्या विचाराने एकमताने व संपादन करण्यात आले. त्यानंतर देश-विदेशातून या कामासाठी आर्थिक निधी प्रधानमंत्री प्राप्त करून घेतला. तत्कालीन लोकसभेचे सभापती राष्ट्रनते शिवराज पाटील चाकूरकर साहेब तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी कायमस्वरूपी पुनर्वसन कार्यासाठी माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांच्याशी चर्चा करून पुढील मार्ग प्रशस्त करण्यात आला. भूसंपादनानंतर स्वयंसेवी संस्था व्यक्ती संघटना व्यवसाय येतात अशा सर्वांचा मोलाचा हातभार कायमस्वरूपी पुनर्वसन कार्यासाठी लाभला. उदाहरण द्यायचे झाले तर लायन्स क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने सुद्धा भूकंपग्रस्ताचे पुनर्वसन करण्यात आले
हे कार्य करत असताना सर्वांनी एक दिलाने एकमताने सर्वांना विश्वासात घेऊन भूकंपग्रस्त भागांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले. आज त्या घटनेला सुमारे 35 36 वर्ष होत आहेत आज त्या दुर्दैवी घटनेचे पाठवून जरी झाले तरी अंगावर शहरी उभे राहतात. ध्यानीमनी नसताना एवढे मोठे संकट त्या काळात आले. संकटावर केंद्र आणि राज्य सरकारने सर्वांच्या सहकार्याने हे आव्हान स्वीकारले सर्वना आधार दिला. दिलासा दिला .आर्थिक मदत केली वैद्यकीय मदत केली शैक्षणिक मदत केली तेथे केले दुधाची जनावरे मूर्त झाली होती शेतात कामाची बैल वगैरे होते सरकारने हे सर्व दिलेले शक्य आहे ते सर्व देऊन व कंबर असताना स्वतःच्या पाया उभे करण्याची फार मोठी मोलाचे प्रयत्न जागतिक पातळीवर झाले त्याचे श्रेय तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंहराव साहेब मुख्यमंत्री शरदराव पवार साहेब.राष्ट्र नेते शिवराज पाटील चाकूरकर लोकनेते विलासरावजी देशमुख औसा तालुक्याची तत्कालीन कर्तव्यतत्पर आमदार श्री किशनरावजी जाधव यानी तर या काळात रात्रंदिवस भूकंपग्रस्त भागात राहून काम केले. धाराशिव जिल्ह्यात डॉ. पद्मश्री पाटील मधुकरराव चव्हाण. आदी मंडळींनी त्या भागात काम केले. या दोन्ही जिल्ह्यात व भूकंपग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले. हा इतिहास स्वर्ण अक्षरानी लिहिला जाईल. व्यथावेदना दुःख अश्रू पुसण्याचे काम तत्कालीन केंद्र आणि राज्य. सरकारने केले. सरकारच्या कार्याला समाजातून मोठ्या प्रमाणात मदतीचे हात धावून आले शिवसेना तेव्हाची.. स्वामीनारायण संस्था .मल्याळम मनोरमा. वृत्तसंस्था . लायन्स.इंटरनॅशनल. लायन्स क्लब ऑफ सोलापूर डॉक्टर्स त्यांचे सर्व सहकारी यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन कार्यात मोठे योगदान लाभले एवढेच नाही तर त्यांनी या भागात वैद्यकीय सेवा सुद्धा केली.
या संस्थेच्या पदाधिकारी भूकंपग्रस्त भागातील आपत्तीग्रस्तांना नातेवाईकांना दोन वेळेचे भोजन तयार करून औसा येथून भूकंपग्रस्त भागात वाहनाद्वारे पुरवठा करण्यात येत असे. वैद्यकीय मदत 24 तास देण्यात येत असे. तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही. भू कंप भूकंपग्रस् भागातील नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम शासकीय पातळीवरील सामाजिक संस्था व्यक्ती संघटना उद्योगपती डॉक्टरांच्या वैद्यकीय संघटना विद्यार्थी संघटना समाजसेवक जे जे शक्य आहे तेथे सर्वांनी मनोभावे केले. अत्यंत प्रामाणिकपणे हा माझाच नातेवाईक आहे अशाच अंतकरणातून सर्वांनी सेवा केली ही गोष्ट केव्हाही ना करता येणार नाही. या निमित्ताने आम्हाला राज्यातील म महायुती सरकारला सूचना करावीशी वाटते. भागातील प्रश्नांचा आढावा घेण्यात यावा. त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी.
1993 मध्ये विनाशकारी भूकंप झाल्यानंतर मानव जात त्यांचे विचार पूर्णपणे बदलले. आहेत खाऊ पणाची भावना वाढस लागली आहे. वेळच तशी होती संकट मोठे होते म्हणून सर्वांनीच काय नको अगदी लहान गोष्टींची पूर्तता करण्यात आली
वैद्यकीय विभागाकडून डॉक्टर्स कर्मचारी हे सर्वांनी रात्रंदिवस. मृतांच्या नातेवाईकांची आपतग्रस्तांची अगदी लहान बालकाप्रमाणे जखमींची शुश्रुषा केली. आणि न भूतो न भविष्यती अशी घटना झाल्यामुळे माणसाचे विचार बदलू लागले व कम झाल्यानंतर हे जनजीवन सुरळीत होत असताना मला माणसा माणसात अविचार आहेत खाऊ णाची भावना वाढीस लाग लागली. आहे. आज त्यास भावनांची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येत आहे. सारे काही फुकट मिळावे अशी भावना केव्हाही चांगली नाही. सरकार संकटग्रस्तांना वेळीच मदत करत असते. दररोज मदत करा म्हटले तर शक्य होणार नाही. आज अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. त्या सर्व दुष्काळग्रस्तांना राज्य सरकार आवश्यक ती सर्वतोपरी मदत करत आहे करण्याच्या अभिवचन दिले आहे. मात्र पुन्हा दुष्काळाचे दिवस मागे पडतील कोणा पुढच्या वर्षी भरपूर अतिवृष्टी होईल सर्व काही त्याकरता करित्याच्य आशीर्वादाने सुजलाम सुफलम होईल. नंतर आपल्याला स्पष्ट करावी लागणार आहे. सरकार भक्त संकटात मदत करते आधार देते दिलासा देते हे लक्षात ठेवावे आणि हे संकट गेल्यानंतर आपण पुन्हा सर्वांनी सामायिक पद्धतीने आपापल्या कामाला सुरुवात करावी व्यस्त व्हावे. .
भूकंप नंतरची ते तीस वर्ष मागे वळून. पाहताना काय वाटते. दगड मातीची लाकडाच्या इमल्याची घरे त्यामधील मानसी माणुसकी अंग अंगात स्वीकारलेली होती भूकंपानंतर सर्व काही नवे आले माणसाच्या बुद्धी ती फरक पडला की मनात पडला हा संशोधनाचा विषय आहे. सरकारने सर्वतोपरी स्वतःच्या पायावर उभे करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. या ठिकाणी विस्तृतपणे आढावा घेणे शक्य होणार नाही पुढील काही दिवसात आपण विस्तृतपणे आढावा घेऊ या. आम्हाला असे वाटते काही महानगरीय पत्रकार यांनी भूकंपग्रस्त भाग पाहिला नाही तेही अधिकारवाणीने हे काम करू शकतात काल्पनिक पद्धतीने ज्याचा त्याचा आहे. त्या काळात तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी या. श्रीराम गोदानी साहेब रामचंद्र देठे साहेब यांच्यासोबत व काँग्रेस भागाचा दौरा केला होता. 1993 चा भूकंप होण्यापूर्वी उमरगा तालुक्यात आज आम्हाला गाव आठवत नाही .
मात्र लोकसभेचे माजी सभापती राष्ट्र नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या दौऱ्यात मला वाटते भूकंपातील पहिला बळी
पेठ सांगवी येथे जाण्याचा योग आला. भूकंपाचा पहिला बळी त्या गावाजवळ पानंदीत गेला होता.. त्यावेळेस मला दैनिक गुणधर्माचे संस्थापक संपादक नाना अर्थात नारायणराव . नानांचचे प्रशिक्षण साधे नव्हते अशा कठीण प्रसंगात ते आम्हाला पाणी करून माहिती काढण्या सांगत असत. वर . अधोरेखित केल्याप्रमाणे भूकंपानंतरची 33 वर्ष. आणि काय घेतले काय शिकलो. आणि जुन्या गावचे गाव कोण हरवलेली माणसं . आम्ही जुन्या गावातील परंपरा जपणारी माणसं काळाच्या ओघात आम्ही आधुनिकतेच्या पाठीमागे धावत सुटलो आहोत. आम्हाला आता पैसा एके पैसा हा धडा पाठ झाला आहे. आता मी सर्व आलो. कमी अधिक प्रमाणात. गावचे गाव पण हरवली वैभव हरवली माणुसकी हरवली. खरेच त्या चिरेबंदी वाड्यात वैभव होते माणुसकी होती. ती होती हिवाळा होता प्रेम होते बंधुभाव होता तो आज आहे काय.
मित्रहो. !
सजन हो!!
महाविनाशकारी आपत्तीनंतर आम्ही काय शिकलो. . एवढे मात्र निश्चित म्हणता येईल की ततत्कालीनकेंद्र आणि राज्य सरकारने भूकंपग्रस्ताचे सर्व दृष्टीने पुनर्वसन केले प्रयत्न केले. काय शिकलो. म्हणण्यापेक्षा आजही शिकण्यापेक्षा शिकण्यासारखे खूप आहे. याची आम्हाला भानच उरले नाही. पुनश्च आम्ही गावचे गाव पण परंपरा हरवलेली माणसं. आम्ही स्वतः माणुसकी विसरत चाललो. दगड मातीच्या माळवदाच्या घरातून आधुनिक सिमेंटच्या घरात येऊन राहत आहोत. मात्र आज ह्या आमचे गाव पण . आमची माणुसकी .आमच्या परंपरा .पूर्वीचा प्रेम जिव्हाळा वाचल्या बंधुभाव पडक्या घराच्या जागी जाऊन शोधत आहोत. आजही आम्हाला मानवी जीवनाची हरवलेली मूल्य शोधता शोधता सापडत नाही.. कधी आम्ही जुन्या पडक्या घराच्या जागी जाऊन ढसाढसा अश्रू ढालतो. आमच्या दिवंगत नातेवाईकांना असे श्रद्धांजली आम्ही सतत वाहत आलो आहोत.
.मात्र आजच्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी सर्वांसोबत आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहोत. श्री गणराय या पुढील काळात अशी महा संकट आमच्या देशात राज्यात कुठेही यायला नको. आम्ही आपल्या सेवेत कमी पडणार नाही हे आमच्याकडून आम्ही घ्या !!जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. !!
!!आमच्याकडे समसमान एकच दृष्टी ठेवा!! श्री गणराया !! श्री गणराया श्री गणराया श्री गणराया
!!हेच मागणी आता गणराया !!तुझ्या पायी सर्वजण सुखी ठेवा फ्री गणराया!!
तूर्त एवढे पुरे !
-विलास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार
95 52 19 72 68


0 Comments