औसा येथे ईदुल अज़हा उत्साहात साजरी.

औसा येथे ईदुल अज़हा उत्साहात साजरी.

औसा प्रतिनिधी एम बी मणियार 



औसा.

मुस्लिम बांधवांकडून

ईद -उल-अज़हा यांनी बकरी ईद औसा शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. औसा येथील काझी,काझी मीर मुजम्मील अली  यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण  झाली. 

सकाळी  नऊ च्या सुमारास  औसा शहरातून ईदगाह मैदानावर  हजारो मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी रॅली काढून ईदगाह मैदानावर जाऊन ईद ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर ईद-उल-अज़हा चा खुदबा पठण करण्यात आला. त्यानंतर दुवा करून ईदच्या नमाजाची सांगता झाली. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत

एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर   नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, कांग्रेस प्रदेश सर चिटणीस अमर खानापुरे,माजी  नगरसेवक गोंवीद जाधव, अविनाश टिके, कृष्णा सावळकर, मंडळ अधिकारी भुजबळ,औसा तहसील कार्यालयाचे लिपिक प्रताप शींदे,  आदि मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments