अभिमन्यु पवार - प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
राज्यात संभाजी ब्रिगेड ही आक्रमक विचाराच्या तरुणांची संघटना म्हणून ओळख आहे.आजपर्यंत संघटनेने मराठा आरक्षण, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण यांच्यासाठी प्रचंड काम केले आहे. बुटाच्या पॉलिश पासुन डोक्याच्या मालिशपर्यंत व्यवसाय करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित केले आहे.त्यामुळे हजारो उद्योजक आज केवळ संभाजी ब्रिगेडमुळे उभे राहिले आहेत.शेतीमालाला हमीभाव आणि दारुमुक्त गावं यासाठी संघटनेने अनेक आंदोलन केले आहेत.अशा संभाजी ब्रिगेडची शिवसेना (उबाटा ) गटासोबत युती असुन लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत असलेल्या युतीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी कसलीही अपेक्षा न ठेवता ताकदीने काम केले होते. त्याचा अपेक्षित परिणाम दिसुन आला असुन आता येणाऱ्या विधानसभेसाठी मात्र संभाजी ब्रिगेडने शिवसेनेकडे २५ जागाची मागणी केलेली आहे. त्यात उमरगा लोहारा आणि औसा विधानसभा देखील आहे.
राज्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे मोठं जाळ असुन मागील २५ वर्षांपासुन संभाजी ब्रिगेडने केलेल्या कामाचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला होणार आहे.
त्यामुळे आम्ही मागितलेल्या जागा आम्हाला निश्चित मिळतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments