वडीलांना मिस्त्री कामात मदत करणार्‍या रेहान ची पोलिसात नियुक्ती.

वडीलांना मिस्त्री कामात मदत करणार्‍या रेहान ची पोलिसात नियुक्ती.



शेख बी जी.

औसा.दि.5 औसा तालुक्यातील मौजे भादा येथील रेहान ताहेर पठाण याची रायगड पोलिसात नियुक्ती झाली. वडील ताहेर पठाण हे आपल्या दोन एकर जमिनीत काबाडकष्ट करून आपला परिवार चालवत आहेत. या शेतीतून योग्य प्रमाणात उत्पन्न निघत नसल्याने त्यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. 
      अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असतानाही आपल्या मुलांना शिकवण्याचा निश्चय त्यांनी केला होता. सर्वच मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा त्यांचा निर्धार पाहून मुलांनीही योग्य शिक्षण घेतले. एक मुलगी अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. वडील मिस्त्री कामात असल्याने त्यांना मदत म्हणून अधून मधून रेहान देखील त्यांच्या कामात मदत करत असायचा. एकीकडे शिक्षण घेत घेत वडिलांच्या कामात मदत करणाऱ्या रेहानच्या कष्टाची चीज झाली व त्याची रायगड पोलिसात भरती झाली. एक महिना पूर्वीच त्याची आणखीन एका विभागात निवड झाली होती.परंतु त्याने महाराष्ट्र पोलीसात आपली सेवा देण्याचे निश्चय केल्याने या निकालाची तो वाट पाहत होता. 
     शेवटी निकाल लागला आणि त्याची निवड रायगड पोलिसात झाल्याची पत्र हाती लागले. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
वडिलांना पोटाचा त्रास होत असतानाही ते मिस्त्री कामा सोबत शेतीकडेही लक्ष देत होते. वडिलांना या कामी रेहान सतत मदत करत असायचा दोन बहिणींचे शिक्षण व एक छोट्या भावाला अभ्यासात मदत करत त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.दररोज पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व ग्राउंड ची तयारी त्याने घरी राहूनच पूर्ण केली. गावातील त्याच्या मित्रमंडळींनी या कामी त्याला खूप मदत केली. त्याची ज्या वेळेला निवड झाली त्या वेळेला गावात त्याचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला होता.
      ज्यावेळी परिवारात निवडीची बातमी कळाली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य गहिवरून आले होते.
रेहानच्या निवडीने मित्रमंडळीसह गावात आनंदाचे वातावरण आहे. सर्व बाजूंनी अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
ताहेर पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की "माझ्या मुलींना देखील अशीच सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. जीवाचे रान करीन परंतु मुलांना शिक्षण देत राहीन."
       पित्याच्या कष्टाचे फळ मिळाले असे गावातील नागरिक म्हणत आहेत.

Post a Comment

0 Comments