पत्रकारिता क्षेत्रात अकरा वर्षे पूर्ण केल्याबद्दल एस.एम.युसूफ़ यांचा सत्कार
बीड (प्रतिनिधी) - पत्रकारिता क्षेत्रात नुकतेच अकरा वर्षे पूर्ण केल्याबद्दल मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या अकरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात एक मुक्त पत्रकार म्हणून सातत्याने लिखाण करणारे तसेच सामाजिक चळवळीत हिरीरीने भाग घेणारे समाजासाठी जिथे फक्त लेखणीने कामे होत नाही असे दिसल्यास आंदोलने करणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात १२ व्या वर्षात पाऊल ठेवले आहे. या प्रित्यर्थ त्यांचा शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस तथा शुजा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शेख इमरान सर आणि सुप्रसिद्ध मदिना ज्वेलर्सचे संचालक शेख अयाज़ यांनी सत्कार केला तसेच यापुढेही एस.एम.युसूफ़ यांच्या हातून पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी व्हावी. सामाजिक मुद्द्यांवर त्यांची मुक्त पत्रकारिता अशाच प्रकारे चालू राहावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

0 Comments