आझाद मध्ये प्राचार्य मासूमदार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*

 *आझाद मध्ये प्राचार्य मासूमदार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*





शेख.बी जी 


औसा:- येथील आझाद महाविद्यालयात पाच वर्षाची  प्राचार्य पदाची यशस्वी कारकीर्द पार पाडल्यानंतर संस्था व महाविद्यालयातर्फे डाॅ. इ.यु.मासुमदार सरांचा सन्मानजनक भरपेहराव, स्मृतिचिन्ह व पुष्पहाराने यथोचित सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

याप्रसंगी प्रा.डाॅ. निसार सय्यद, डाॅ.दुष्यंत शिंदे, डाॅ. रंगराव सुर्यवंशी, डाॅ. मेहराज बरोटे डाॅ. शहाजान शेख यांनी त्यांच्या एकूण पाच वर्षांच्या  सेवाकाळातील कार्याचा संदर्भ देत, त्यांनी राबविलेल्या विविध अभिनव उपक्रमाचा,  त्यांच्यातील गुणग्राहकता, वक्तशीर, मितभाषी, विनम्रता, संयमी व धर्मनिरपेक्ष इ. पैलूंचा विविध दाखले देत गुणगौरव केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य निजाम सरांनी त्यांच्या ठायी असलेल्या सद्गुणांची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष व संस्थासचिव डाॅ. अफसर शेख यांनी  दिलेल्या संधीचे डाॅ.मासूमदार यांनी सोने करून महाविद्यालयाचा लौकिक वाढवल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. सत्काराला उत्तर देतांना संस्थेने पाच वर्ष काम करण्याची संधी दिली आणि सर्व सहकारी प्राध्यापक व कर्मचा-यांनी मोलाची खंबीर साथ दिल्यामुळेच मी हे कार्य करु शकलो याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी त्यांचे वडील उस्मानसाब, सुविद्य पत्नी सौ. नसरीन मॅडम, त्यांचे इतर कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.डाॅ. बाबासाहेब इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन डाॅ. मजहर कोतवाल यांनी व वार्तांकन डाॅ. दुष्यंत शिंदे यांनी केले.  कार्यक्रमास संस्थाध्यक्ष प्रा.संजयजी कुलकर्णी, संस्था सहसचिव सौ. गजाला अफसर शेख, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments