ऐका ही कथा औस-- सास्तुर गाडीची कथा

 ऐका ही कथा 

औस-- सास्तुर गाडीची कथा !!

सजन हो !!




आपण नेहमीच एसटीने प्रवास करत असतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा ही जीवन वाहिनी आहे! अलीकडील काळात महा युती सरकारच्या राज्यात तर एसटीला चांगलेच  सोन्याचे दिवस आले आहे त! एसटी तिकीट दरात 50% आणि अति जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास !महाराष्ट्रात कुठेही जा कुठेही भ्रमंती करा! कुठेही जेवण खान करा; कुठेही खा !पुरी भाजी खा! इडली डोसा! मजाच मजा.!? एसटीने प्रवास म्हणजेच एक तर बिलाखर्ची  बटई असा आनंदाचा मजेदार प्रवास! अति ज्येष्ठ नागरिक अर्थातच वृद्ध लोक जास्त वद्ध लोक हा आनंद रात्रंदिवस लुटत आहेत.!! खरेच धन्य ते राज्यातील महायुतीचे सरकार.!! या सरकारने जनतेची नाडी अचूक ओळखली आहे! ज्यांना नवे नवे!हवे ते राज्यातील महायुतीच्या सरकारने द्यावे!! नव्हे सरकार जनतेला ती नवीन आर्थिक नवीन सवलती देऊन आनंदात मजेत ठेवत आहे!. विरोधक लाखो बुरा चाहे मंजुरे खुदा होता है !वही जो होता है मंजुरे खुदा होता है !!महाराष्ट्र में महायुती का सरकार राज्य करत आहे. मुख्य विषय असाच आहे औसा ते सास्तुर ही गाडी भूकंपग्रस्त भागाची सेवा करते नव्हे !तेथील जनतेची आबाळळवृद्धांची सेवा करते म्हणून एसटीला आपण प्रथम धन्यवाद देऊया. 

औसा ते सास्तुर या गाडीला प्रवाशांचा आबाल वृद्धांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो ..आणि प्रवासी संख्या एवढे असते की एक गाडी आली की सुमारे शंभर सव्वाशे प्रवासी गाडीवर तुटून पडतात. मग मग चालक आणि वाहक यांचा नाईलाज होतो. जेवढे प्रवासी भरभरून घेता येतील तेवढे ते घेत असतात. आणि गर्दी आहे म्हणून काही वृद्ध अशक्त बालके पुढल्या गाडीने जाऊया म्हणून थांबतात तर पुढच्या गाडीलाही प्रवाशांची त्याहून अधिक गर्दी .मग काय करावे सांगा.? आता एकच पर्याय शिल्लक आहे! की औसा ते सास्तुर या मार्गावर आणखी चार गाड्या सोडण्यात आल्या तर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकेल. थोडक्यात अतिवृद्ध मोफत प्रवासी आणि विद्यार्थी यांच्यासाठी स्पेशल गाड्या ठेवण्यात याव्या त्यानंतर अर्ध्या तिकिटातील महिला प्रवाशांसाठी वेगळ्या गाड्या ठेवण्यात याव्यात. आणि हो खरेच औसा ते सास्तर औसा ते सोलापूर अर्थात औसा नागरसोगा दापेगाव जवळगा( पोमादेवी) हरेगाव या मार्ग लिंबाळा (दाऊ )या मार्गाने सोलापूरला गाडी जाते आणि या गाड्यांना चांगला भरभरून प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असतो. म्हणून एखाद्या प्रवाशाचे तिथेही महत्त्वाचे काम असू द्या प्रवाशांच्या गर्दीमुळे गाडी मिळेलच याचा भरोसा नाही रामभरोसे!! म्हणता येईल. म्हणूनच आता एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी. वृद्ध .मोफत वृद्धांसाठी मोफत गाडी वेगळ्या सोडण्यात यावे आणि हो त्या गाडीवर असा फलक असावा की मोफत गाडी निघाली आहे चला चला!! सास्तुरला चला!! आणि या मार्गावरील प्रवाशांना अधिक अधिक सुखकर पर्व देण्याचे प्रयत्न करावेत.! एस टी महामंडळाच्या प्रवासी सेवेचे आम्ही नेहमीच कौतुक केले आहे!! औसा धाराशिव धाराशिव औसा या मार्गावर ही काही वाहकाने चालक उत्तम शोधतात याविषय आम्ही त्यांचे कौतुक केले होते !आणि अधून मधून मार्गदर्शनही करण्याचे प्रामाणिक पत्रकारितेची भूमिका आम्ही पार पाडत आहोत. !!महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवा प्रवाशांना सेवा निरंतर देत आहे ! एस टी महामंडळा अंतर्गत सर्वच अधिकारी कर्मचारी चालक वाहक मेकानिक या सर्वांचेच योगदान एसटीच्या निरंतर सेवमध्ये आहे!!

!एसटीचे वेदवाक्य ब्रीदवाक्य अशी आहे की "प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी!" या ब्रीद वाक्याप्रमाणे महामंडळाच्या वतीने आवश्यक तेथे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या प्रमाणात एसटी गाड्या अधिक सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांना समाधानकारक सेवा मिळू शकेल. चांगली सेवा मिळणे हा प्रवाशांचा हक्क आहे .त्यांनी चांगली सेवा देणे हा एसटी महामंडळा चे कर्तव्य आहे सध्या महामंडळांतर्गत सर्वच अधिकारी कर्मचारी यांना समाधानकारक वेतन मिळत आहे. सध्या तर  या मार्गावरील गाड्यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे . (शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025)

गाडी येतात प्रवाशांची एवढी गर्दी असते की गाडीमधील आसानक्षमतेच्या दुप्पट प्रवासी गाडीमध्ये जाण्यासाठी धडपड करताना दिसतात.. त्यामध्ये शालेय विद्यार्थी. विद्यार्थिनी. मोफत प्रवास करणारे अति ज्येष्ठ नागरिक अर्ध्या तिकीटावर प्रवास करणाऱ्या माता-भगिनी ज्येष्ठ नागरिक यांची गर्दी असते .म्हणून प्रवाशांसाठी  या मार्गावर आणखी दोन गाड्या अधिक सोयी केली तर प्रवासाच दृष्टीने प्रवाशांची सोय होईल आणि जास्त गर्दीमुळे होणाऱ्या किरकोळ तक्रारी होणार नाहीत. तसेच प्रवाशांना समाधानकारक प्रवास केल्याचा खरा आनंद मिळू शकेल. हे केवळ प्रवाशांचे मान्य आहे.  सास्तुर या मार्गावर सेवा करणाऱ्या वाहक आणि चालक यांनाही असाच अनुभव आहे की या गाड्यांना प्रवाशांची खूप गर्दी होते. अनेक प्रवाशांना उभा राहूनच प्रवास करावा लागतो. अधिक गाड्या सोडण्यात आल्या तर विद्यार्थी विद्यार्थिनी मोफत चे ज्येष्ठ प्रवासी तसेच अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या माता भगिनी ज्येष्ठ अति ज्येष्ठ नागरिक यांची सोय होऊ शकेल हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने अधिक दोन गाड्या सोडून प्रवाशांचा दुवा घ्यावा त्यासोबतच महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात ही वाढ होऊ शकेल तूर्त एवढे पुरे !

-विलास कुलकर्णी 

ज्येष्ठ पत्रकार 

सोलापूर

Post a Comment

0 Comments