*नवीन पाईप लाईनची मागणी!"*
औसा : प्रतिनिधि
आज औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना करीम नगर भागातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांबाबत लेखी निवेदन देण्यात आले. युवक काँग्रेस औसा कार्याध्यक्ष खाजा शेख यांनी सादर केलेल्या या निवेदनात, संपूर्ण करीम नगर भागात नवीन पाण्याची पाईप लाईन टाकण्याची आणि काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेल्या व खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच कुमार स्वामी कॉलेजजवळ पप्पू भाई शेख यांच्या फ्लॅटपासून सैलानी शेख यांच्या घरापर्यंत स्वतंत्र नवीन पाईप लाईन बसवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. रहिवाशांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
0 Comments