विश्वंभर गुंडकर यांचा सेवापुर्ती निमित्त चाहत्याकडून गौरव

 विश्वंभर गुंडकर यांचा सेवापुर्ती निमित्त चाहत्याकडून गौरव





 औसा प्रतिनिधी भादा गावाचे मूळ रहिवासी असलेले विश्वंभर मुळाप्पा गुंडकर हे आरोग्य विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदावरून अत्यंत प्रामाणिकपणे प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्याकडून हॉटेल प्राप्ती औसा येथे गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुनील सिद्धाराम आप्पा मिटकरी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवणीकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू कोळी भादा ग्रामपंचायतचे उपसरपंच बालाजी शिंदे उद्धव काळे धनंजय परसणे आदी मान्यवर उपस्थित होते विश्वंभर गुंडकर यांनी प्रशासकीय सेवेमध्ये आरोग्य विभागातून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल त्यांचे नातेवाईक व मित्र परिवाराच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता मान्यवरांच्या हस्ते विश्वंभर गुंडकर आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सौ चंद्रकला विश्वंभर गुंडकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी विश्वंभर गुंडकर यांच्या सेवा कार्याला उजाळा देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या विश्वंभर गुंडकर यांचे अनेक नातेवाईक व मित्र परिवारांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित त्यांना हॉटेल प्राप्ती येथे विश्वंभर गुंडकर यांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती खडके यांनी केले

Post a Comment

0 Comments