*इक्बाल नगर ग्राउंडमध्ये वृक्षारोपणाचा हरित उपक्रम
परभणी (प्रतिनिधी) – “हरित परभणी – सुंदर परभणी” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी इक्बाल नगर परिसरातील ग्राउंडमध्ये स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तब्बल ५० रोपांची लागवड करण्यात आली व तसेच वृक्षरक्षक जाळ्याही बसविण्यात आल्या.
कार्यक्रमावेळी परिसर आकर्षक व हिरवाईने नटावा यासाठी गार्डनची उभारणी करण्यात आली. या उपक्रमात लावण्यात आलेल्या झाडांमध्ये छायादार वृक्षांसोबतच फुलझाडांचा समावेश असल्याने परिसराला लवकरच हरित रूप प्राप्त होणार आहे.
याप्रसंगी अली शाह खान, डॉ.अब्दुल अजीज, डॉ.हारून रशीद तांबोळी, डॉ.मुदस्सर जिकरे, शेख मारूफ, इम्रान हुसैनी, सलीम काच्छी, ॲड. तौफिक हाश्मी, ॲड. ख्वाजा हाश्मी, शफीक अहमद खान, जफरउल्ला खान, फजलुल्ला हुसैनी, जुबेर हाश्मी, हाफीज़ साजिद खान, इम्रान खान, फैजान कादरी, शेख मक़सूद, अब्दुल अझीम, रमीझ खान, सय्यद नासर, अब्दुल हफीज, शिवाय रमेश, बाळू मामा, मुकुंद राव यांच्यासह इतर मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
स्थानिक नागरिकांनी वृक्षारोपणाबाबत उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “हवामानातील वाढती उष्णता व प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यासाठी झाडे लावणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा व चांगले वातावरण मिळावे यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.”
या हरित उपक्रमामुळे इक्बाल नगर परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments