गावोगावी फिरून व्यावसाय करणार्‍या व्यापार्‍याच्या घराला लागली आग,लाखो रुपयांचे नुकसान

 गावोगावी फिरून व्यावसाय करणार्‍या व्यापार्‍याच्या घराला लागली आग,लाखो रुपयांचे नुकसान.










शेख बी जी 


औसा.दि.16 शहरातील हद्दवाढ झालेल्या वस्तीमध्ये आपले व्यवसाय करणाऱ्या एका छोट्या व्यापाऱ्याच्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत सगळे कुटुंब आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याच्या तयारीत असताना अचानक एका खोलीतून धुराची लोट येत असल्याचे दिसले व एकच टाहो फुटला,घराला लागलेली आग पाहून कुटुंबातील व्यक्ती मदतीसाठी सैरावैरा फिरु लागले.



15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी औसा शहरातील के के नगर भागात राहत असलेले नयुम जर्दी हे छोटेसे व्यापारी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावोगावी जाऊन व्यावसायिक करत असत. स्वतंत्र दुकान घेण्याची ऐपत नसल्याने ते गाडीत गावोगावी जाऊन आपला उदरनिर्वाह चालवत असे. या व्यापाऱ्याच्या घराला सकाळी आठ वाजता घरातील शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत रूममध्ये ठेवलेल्या सर्व साहित्य जळून खाक झाले.शेजाऱ्यांनी व स्थानीय लोकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. स्टॉक ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदाम नसल्याने याच ठिकाणी त्यांनी सर्व कापडे ठेवली होती. अंदाजे जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर सर्वांनी विचारपूस केली व संबंधित तलाठी यांना पंचनामा करण्यास सांगितले.यावेळी शहरातील असलम खान ,उमर पंजेशा माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख तसेच सुनील उटगे यांनी या ठिकाणी भेट देऊन विचारपूस केली व मदतीचे आश्वासन दिले.या आगीमुळे या कुटुंबाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तात्काळ मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे यावेळी भेटीदरम्यान स्थानीय नेत्यांनी वचन दिले.



Post a Comment

0 Comments