माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 16/08/2025 रोजी ठीक 7.00 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे द्वार क्रं 1 ,14 ,7,8,6,9,4,11,3,12 (एकूण 10 द्वार) हे उघडण्यात आले असून तेरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत द्वार क्रं 1,14,7,8,6,9,4,11,3,12 ( एकूण 10) ही वक्रद्वारे 10 सेंटिमीटर ने उघडणार असून एकूण 3806.56 क्यूसेक्स (107.79 क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.
पुरनियंत्रण कक्ष
निम्न तेरणा प्रकल्प माकणी
0 Comments