उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार प्रदान
सोलापूर- नुकत्याच जालना येथे रोटरी इंटरनॅशनलच्यावतीने विजयोत्सव २०२४-२५ साजरा करण्यात आला. यावेळी रोटरीचे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू यांच्या हस्ते तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनेटेड रोटेरियन जयेश पटेल व डिस्टिक गव्हर्नर सुधीर लातूरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २०२४-२५ मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात रोटरी क्लबतर्फे वेगवेगळे कार्यक्रमांना उत्कृष्ट आयोजन करून सामाजिक सेवा केल्याबद्दल रोटरी क्लब व पदाधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीलाही सन २०२४-२५ मध्ये रोटरी इंटरनॅशनलच्या आदर्शांना पुढे नेण्यासाठी उत्कृष्ट सेवा आणि अटळ समर्पणाच्या सन्मानार्थ क्लबाला पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार असिस्टंट गव्हर्नर विठ्ठल वंगा यांनी क्लबच्यावतीने स्वीकाला.
हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या आठवडा मिटींगमध्ये असिस्टंट गव्हर्नर विठ्ठल वंगा यांनी क्लबचे अध्यक्ष रोट. अकबरसाहेब नदाफ व सचिव रोट. बसवराज बिराजदार यांना सुपूर्द केला. यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष रोट. नागेश शेंडगे, रोट. महेश साळुंके, डायरेक्टर रोट. अनिल चंडक, रोट. मो. इक्बाल बागबान, रोट. योगनाथ कुडते आदी उपस्थित होते.
0 Comments