भारताच्या सर्वोच्च न्यायालया चे सर न्यायाधीश न्यायमूर्ती श्री. भूषणाजी गवई साहेब यांच्यावर परवा दिनांक 06/10/2025 रोजी सर्वोच्य न्यायालयात भ्याड हल्ला चा या घटनेचा निषेध म्हणून औसा विधीज्ञ मंडळ
भारताच्या सर्वोच्च न्यायालया चे सर न्यायाधीश न्यायमूर्ती श्री. भूषणाजी गवई साहेब यांच्यावर परवा दिनांक 06/10/2025 रोजी सर्वोच्य न्यायालयात भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला या घटनेचा निषेध म्हणून औसा विधीज्ञ मंडळ यांनी तीव्र शब्दात निषेध करून काळी फीत बांधून कामकाजात सहभाग नोंदवला तसेच दुपारी वकील मंडळ औसा ची तातडीची बैठक वकील मंडळ औसा चे अध्यक्ष ॲड. सचिन शामराव साळुंके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि माननीय सर न्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई साहेबांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला यावेळी वकील मंडळाचे उपाध्यक्ष सिराज (राजू) पटेल सचिव शालिवाहन शिंदे सहसचिव संतोष औटी कोषाध्यक्ष मनोज तिगाडे सोबत वकील मंडळ औसाचे सर्व ज्येष्ठ वकील आणि ज्युनियर वकील आणि कर्मचारी उपस्थित होते यानंतर औसा तालुका तहसीदार यांना दोषी आरोपीवर कडक कार्यवाही करावी असे निवेदन देण्यात आले अणि भारतीय न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्य पद भूषवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे भारताच्या न्याय व्यवस्थे च्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे यावेळी विधिज्ञ मंडळ अध्यक्ष ॲड. सचिन साळुंके पाटील यांनी व्यक्त केले


0 Comments