लातूरच्या लेकीची उत्तुंग भरारी!
लातूरच्या रेणापूरमधील विद्यार्थीनी मदिया खदीर सय्यद हिने जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय(ITI) परीक्षेत ९९.६६ टक्के गुण मिळवून भारतात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. मदियाने मिळवलेल्या या यशाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचा सन्मान करत केले आहे. मदियाच्या सततच्या प्रयत्नांमुळेच तिला हे यश प्राप्त करता आले. मदियाने मिळविलेल्या यशासाठी तिचे व तिच्या परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.
मदियाने प्रचंड कष्टातून मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. वडील बांधकाम कामगार असून त्यांच्या कष्टाची जाण ठेवत, स्वतःची ध्येय पूर्ण करण्यासाठीची मदियाची ईच्छाशक्ती खरंच कौतुकास्पद आहे.
भविष्यात देखील मदिया तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासातून जिद्दीने यश मिळवत राहील. मदिया सय्यदला तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#MadiyaSyyed #LaturPride #InspiringSuccess #GirlsEducation #DaughterOfLatur
#HardWorkPaysOff #WomenInSkills #SkillIndia #PMRecognized #MakeIndiaProud

0 Comments