मन्नाथपुर-पालापूर चा (MSEB) लाईट खात्याशी ३६ चा आकडा...
मन्नाथपुर-पालापूर ही धानोरा पोस्टातील एक ग्रामपंचायत असलेले दोन गावं असून, तालुका निलंगा आहे, जवळपास २५० ते ३०० घर आणी १५०० च्या जवळपास लोक संख्या असलेले गाव आहेत, क्षेत्र फड जवळपास १५०० हेकटर पेक्षा ज्यास्त आहे, आणि निलंगा शहरा पासून २ ते ३ कि.मी अंतरावर आहेत, म्हणजेच निलंगा तालुक्यातील सगळ्यात जवळ चे गाव..!
एवढं जवळ असून सुद्धा २४ तासात ८ तास ही लाईट राहत नाही, शहर च्या येवढया जवळ असून ही विजेची सुविध बरोबर होत नसल्याने गावातील लोक परेशान झाले आहेत.
ना सिंगल फेज ना थ्री फेझ काही ही सुविधा वेळेवर होत नाही, आणि फोन केल्यावर ही काही संतुष्टी होत् नाही, काम चालू आहे असे कारण सांगून फक्त टाळाटाळ करत आहेत, ह्याच करायच काय ह्या विचारात आहेत.. कोण वारस आहे की नाही अस झाल आहे..



0 Comments