औसा नगर परिषद निवडणूक 2025-दोन दिवसांत 29 उमेदवारांचे अर्ज दाखल
औसा (प्रतिनिधी)-औसा नगर परिषद सामान्य निवडणूक 2025 साठी नामांकन प्रक्रिया वेग घेऊ लागली आहे.17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असताना 14 आणि 15 नोव्हेंबर या दोन दिवसांत एकूण 29 उमेदवारांनी आपली नामांकने दाखल केली आहेत.ही माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली.पहिल्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक तर विविध प्रभागांसाठी एकूण 10 अर्ज प्राप्त झाले.तसेच दुसऱ्या दिवशी उमेदवारांचा प्रतिसाद वाढला आणि विविध प्रभागांतून 18 अर्ज दाखल झाले. निवडणूक चुरस वाढण्याची शक्यता-17 नोव्हेंबर हा नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने पुढील 48 तासांत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही प्रभागांत आतापर्यंत एकही अर्ज दाखल न झाल्याने तेथील परिस्थिती उत्सुकता वाढवणारी ठरत आहे.निवडणूक विभागाने संपूर्ण नामांकन प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केल्याचे सांगितले आहे.
0 Comments