*बज़्मे ग़ालिब सोलापूरतर्फे उर्दू खुला एकांकिका स्पर्धेचे आयोजन*
सोलापूर- बज़्मे ग़ालिब सोलापूरतर्फे दि. 30/11/2025 रविवार रोजी सकाळी ११ ते रात्री 8 पर्यंत हुतात्मा स्मृती मंदीर येथे उर्दू खुला एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकुण ६ संघानी भाग घेतला असून एम. ए. पानगल उर्दू हायस्कूलतर्फे पहिली एकांकिका "एक्सपेरीमेंट", गॅलक्सी अकॅडमीतर्फे दुसरी एकांकिका "साढ़े छे रुपये का क्या किया?", तिसरी एकांकिका इकरा अकॅडमीतर्फे "सरगोशी", चौथी एकांकिका जॉईंन फॉर पीसतर्फे "पेशकश" तसेच मधुर ध्वनीतर्फे "प्रेम की यातना" आणि आर्ट अकॅडमीतर्फे
शेवटची एकांकिका "इन्वेस्टिगेशन" सादर होईल.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५०००/- रुपये व बज़्मे ग़ालिब ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक १००००/- रुपये व ट्रॉफी तर तृतीय ७०००/- रुपये व ट्रॉफी देण्यात येणार असून त्याचबरोबर उत्कृष्ठ लेखक, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट अभिनय (पुरुष), उत्कृष्ट अभिनय (स्त्री) असे सात वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व रसिकांसाठी ही स्पर्धा खुली राहणार असून तरी सर्वां सहभाग नोंदवून एकांकिका स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष ज्येष्ठ कवी व लेखक बशीर परवाज़ यांनी केले.

0 Comments