औसा राजकारणातील एक मोठं वळण-तब्बल 46 वर्षांनंतर पहिल्यांदाच पै.ॲड.मुजीबोद्दीन पटेल घराणं नगरपालिकेच्या उमेदवारीपासून अलिप्त.
औसा तालुक्यातील राजकारणात पै.ॲड.मुजीबोद्दीन पटेल घराणं हे एक सुसंस्कृत,संयमी,विचारशील आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखलं जातं.सन 1980 पासून अखंड 46 वर्षे काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून शहर,तालुका आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात या घराण्याने बजावलेली भूमिका कोणीही नाकारू शकत नाही.परंतु यंदाच्या स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच या कुटुंबातील एकही उमेदवार रिंगणात नाही आणि हेच आजच्या राजकीय चर्चेतलं सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे.
औशाच्या विकासाशी निगडित असलेलं नाव म्हणजे ॲड.मुजीबोद्दीन पटेल होय.सामाजिक बांधिलकी,शैक्षणिक उन्नती,सर्वसमावेशक राजकारण,सौहार्द आणि संयम या मूल्यांवर या कुटुंबाने चार दशकांहून अधिक काळ काम केलं.अनेकांना मार्गदर्शन,अनेकांना राजकारणात उभं करण्याचं कार्य आणि संघर्ष काळातही संयम न सोडणारी त्यांची शैली स्थानिक नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करते.तब्बल 46 वर्षांची परंपरा मोडून पै.ॲड.मुजीबोद्दीन पटेल घराणं निवडणुकीपासून दूर राहणं हे औसा नगरपरिषद राजकारणाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे.आज ज्या काळात स्वच्छ,लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे,त्याच वेळी अनुभवी नेतृत्व राजकीय प्रक्रियेपासून दूर राहणं हा चिंतेचा विषय आहे.या निर्णयामागचं खरं कारण नेमकं काय? हा प्रश्न सामान्य नागरिकांपासून ते राजकीय वर्तुळांपर्यंत चर्चेचा विषय आहे.
पै.ॲड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या राजकीय विचारसरणीमध्ये वाढलेले हाजी हिमायत पटेल यांचे चिरंजीव रिजवान पटेल,डॉ.इम्रान पटेल तसेच ॲड.समियोद्दीन पटेल हे तिघेही यंदाच्या निवडणुकीत उमेदवारीपासून दूर आहेत.पुढील पिढी राजकारणात सक्रिय असूनही आज ते रिंगणात नसणे ही परिस्थिती विचार करण्यास भाग पाडते.
पारदर्शक विकास आणि सौहार्दपूर्ण राजकारणाची ओळख निर्माण करणाऱ्या या घराण्याच्या अनुपस्थितीमुळे औसा नगरपरिषदेतील राजकीय समीकरण बदलणार काय? खरंतर निवडणुकीत स्पर्धा करणाऱ्या इतर उमेदवारांना ही जागा भरून काढता येईल काय? तसेच सामाजिक समतोल राखण्याचे आणि विकासाची दिशा ठरवणारे नेतृत्व कोण देणार? हा ही एक मोठं प्रश्नचिन्ह आहे.शेवटी आदर्श,संयम आणि लोकसेवा यांची परंपरा जपणारं नेतृत्व निवडणुकीपासून दूर राहत असल्याची खंत सुद्धा आहे..अजून काय?
प्रश्नचिन्ह?-ॲड.इकबाल शेख/औसा.
मो.9545253786

0 Comments