औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

 औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025

प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज 





 औसा:   आज दिनांक 01 /12/ 2025 रोजी औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांचे तृतीय  प्रशिक्षण प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय परिसर येथे पार पडले. दिनांक 02/12/2025 रोजी मतदान होणाऱ्या 36 मतदान केंद्र व राखीव 5 असे एकूण 41 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकांमध्ये  164 अधिकारी व कर्मचारी   यामध्ये प्रत्येक बूथसाठी 1 महिला कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रासाठी  प्रत्येकी 2 पोलीस कर्मचारी व शहरात 7 पोलीस विशेष पथके असे एकूण 240 पोलीस कर्मचारी  नियुक्त  करण्यात आलेली आहेत. सर्व मतदान केंद्रातील इमारतीमध्ये आरोग्य सेवकाची व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. शहरातील दिव्यांग मतदारांसाठी नगरपालिकेतर्फे व्हीलचेअर व इतर सुविधा करण्यात आली आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मदत BLO यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यामार्फत मतदान केंद्राची स्वच्छता करण्यात आलेली आहे. आदर्श मतदान केंद्राची निर्मिती पंचायत समिती मध्ये तयार करण्यात आले आहे.



  आज मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतमोजणी कर्मचारी यांना EVM  हाताळणी, निवडणूक साहित्य बाबत माहिती, निवडणुकीचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी श्री घन:श्याम आडसूळ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मंगेश शिंदे, प्रशिक्षक श्री. नागपुरे व मास्टर ट्रेनर श्री सचिन डोंगरे यांनी तसेच सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी मतदान यंत्र प्रत्यक्ष हाताळणी बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडणूक निरीक्षक श्री.अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी  उपस्थित राहून निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.  सर्व अधिकारी कर्मचारी पथकासह मतदान केंद्रावर सुरळीतपणे पोहोचले आहेत व मतदानासाठी सर्व बूथ तयार झाले



 आहेत.

 तसेच दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी असणारे अधिकारी, उमेदवार  यांचे मतमोजणी प्रतिनिधी, पत्रकार यांना मतमोजणी चे पास देण्याचे काम तहसील कार्यालयात सुरु असून मतमोजणी  पास असल्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही.



 दिनांक .02/12/2025 रोजी होणाऱ्या मतदानासाठी एकूण 32320 मतदार हे 23सदस्य व 1 नगराध्यक्ष यासाठी मतदान करणार आहेत. एकूण मतदारापैकी  16466 पुरुष व 15853 महिला तर इतर मतदार संख्या 1  इतकी आहे. औसा नगर परिषद निवडणुकीत शांततेत मतदान प्रक्रिया करून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याची आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.



Post a Comment

0 Comments