औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – 2025 : मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज
प्रशिक्षण पूर्ण, मतदान केंद्रांची अंतिम तयारी सुरू
औसा – औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 संदर्भातील मतमोजणी कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण आज दिनांक 20 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसील प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न झाली.
दिवसांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीचे सर्व साहित्य तयार ठेवण्यात येणार असून, एकूण 11 मतमोजणी टेबलांची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलासाठी मतमोजणी सहाय्यक, मास्टर ट्रेनर, सुपरवायझर, सीपीआय यांसह सर्व आवश्यक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. EVM स्ट्रॉंग रूम पथक, साहित्य पथक, रिसीव्हिंग पथक, डिस्पॅच पथक अशा सर्व पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रात सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींना देखील मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार असून, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेण्यास बंदी असणार आहे. मतमोजणी स्थळात प्रवेशासाठी अधिकृत पास आवश्यक ठरणार आहे.
मतमोजणीचे काम सकाळी 9 वाजता सुरू होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवले आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निवडणूक आचारसंहितेनुसार पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
औसा नगर परिषद निवडणूक-2025 च्या मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


0 Comments