हजरत सुरतशाह उर्दू हायस्कूल, औसाचा निकाल ८५ टक्के; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
औसा (प्रतिनिधी):
फखरोद्दीन अलीअहमद एज्युकेशन सोसायटी, औसा द्वारा संचलित हजरत सुरतशाह उर्दू हायस्कूलने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल ८५% लागला असून, शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.
शाळेतून शेख सबा जाफर हिने ८२.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर सय्यद महेक लतिफ हिने ७०.२०% गुणांसह घवघवीत यश मिळवले आहे.यासोबतच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या उत्कृष्ठ निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शाळेच्या वतीने आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी शाळेचे कौतुक केले आहे.

0 Comments