पेट्रोल पंपांवरील इंधन तुटवड्याबाबतएम आई एम चे तहसीलदारांना निवेदन
औसा : शहरासह तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप करत मुजफ्फरअली इनामदार यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांना शेती मशागतीच्या कामासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना इंधन मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या पावसाळ्यापूर्वी शेती मशागतीची कामे सुरू असून ट्रॅक्टर व अन्य कृषी यंत्रांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत आहे. मात्र काही पेट्रोल पंप चालकांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांना व शेतकऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. तसेच संध्याकाळी लवकर “पेट्रोल उपलब्ध नाही” असे सांगून पंप बंद करण्यात येत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित पेट्रोल पंप चालकांवर लक्ष ठेवून इंधनाचा कृत्रिम तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच नागरिकांना नियमितपणे पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी एम आई एम च्या वतीने सय्य्द मुज़फ्फर अली ईनामदार यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी लातूर तसेच औसा पोलीस स्टेशनलाही देण्यात आल्या आहेत.

0 Comments