औश्यातील उर्दू घर व स्पर्धा परीक्षा केंद्राचे झाले खिंडार मलाईच्या कामात पालिकेला रस ज्ञानाच्या बाबतीत मात्र निरस.

 औश्यातील उर्दू घर व स्पर्धा परीक्षा केंद्राचे झाले खिंडार 


मलाईच्या कामात पालिकेला रस 

ज्ञानाच्या बाबतीत मात्र निरस.





बी जी शेख 


औसा.महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा व उर्दू भाषेच्या समृध्दीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही उर्दू भाषिक बहुल शहरामध्ये उर्दू घर उभारण्यात आले.यात औसा शहराचा समावेश होतो.या ठिकाणचे उर्दू घर हे खिंडार झाल्याचे चित्र आहे.



    सद्य:स्थितीत नांदेड, मालेगाव, सोलापूर आणि नागपूर येथे उर्दू घरे उभारण्यात येत आली तसेच नांदेड आणि मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण झाले.सन २०२१-२२ मध्ये उर्दू घरासाठी रु.७.०० कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती.या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आले.मात्र प्रत्यक्षात ते अंमलबजावणी झाली नाही म्हणून शहरातील हे उर्दू घर खिंडार झाले आहे.या ठिकाणी शहरातील गावगुंडांनी मोडतोड केली आहे.काचा फोडण्यात आल्या आहेत व दरवाजे तोडली गेली आहेत.आत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

    या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी मूळ धोरण दि.२१/७/२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले होते.आता त्यात काही नवीन मुद्यांची भर घालण्यात आली असून दि.२८/६/२०२१ च्या शासन निर्णयान्वये सविस्तर नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच या उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

    उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील.उर्दू घरातील वाचनालय, ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम,अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण,अभ्यासक्रम चालविण्यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविण्याचे प्रयत्न केले जातील व त्या अनुदानातून काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केले जातील असे वाटले होते.पण याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे बोलले जात आहे.

👉" उर्दू घराच्या बाबतीत अध्यक्षांशी आमचे बोलणे झाले आहे.लवकरच आम्ही पुस्तके मागवण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवणार आहोत. व या ठिकाणी एखादा उर्दू रिटायर्ड प्राध्यापक मानधनावर नियुक्त करून व्यवस्थितरित्या चालवण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत.अल्पसंख्यांक विभागाशी आमचं बोलणं झालं आहे."

    मंगेश शिंदे. मुख्याधिकारी औसा नगरपालिका.

👉 "मोठ्या प्रयत्नातून आम्ही उर्दू घराचे बांधकाम केले.मध्यंतराच्या काळात प्रशासकीय कारभार असल्याने या उर्दू घराकडे लक्ष दिले गेले नाही. सद्यस्थितीत बजेट नाही परंतु आम्ही लवकरच हा विषय मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न करणार आहोत."

 जावेद शेख.

बांधकाम सभापती 

औसा नगरपालिका.

👉 "जेव्हापासून या उर्दू घराची निर्मिती झाली तेव्हापासून आम्ही वेळोवेळी पालिकेला अर्ज केला व या ठिकाणी पुस्तके व उर्दू पेपर  मागवण्यासंदर्भात प्रयत्नशील राहिलो परंतु पालीकेने आम्हाला प्रतिसाद दिला नाही. पालिका याबाबतीत नेहमी निरस असल्याचे दिसून आले आहे.भविष्यात मात्र या संदर्भात आम्ही लढत राहणार आहोत."

    मुस्लिम कबीर 

 ज्येष्ठ पत्रकार व उर्दू अभ्यासक रिटायर्ड शिक्षक औसा.

पालिकेने उर्दू घरासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन या ठिकाणी अभ्यासिका व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करून नाही दिल्यास येणाऱ्या काळात उर्दू अभ्यासक एक मोठा लढा उभा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments