लातूर फार्मसीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 लातूर फार्मसीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी






   लातूर:भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीसुर्य ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात साजरी करण्यात आली . सावित्रीबाई फुले यांच्या  प्रतिमेस पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,संचालक नंदकिशोर बावगे, प्रा. अतुल कदम , प्रा.भागवत सोमवंशी, प्रा.आदिनाथ पाटील, प्रा.मनकरना कराळे,प्रा. सुप्रिया जाधव, प्रा पूजा पाटील,प्रा.प्राजक्ता जाधव, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे,शेबीर शेख आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून विनम्र अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments