अरबिया तक्वियतुल ईमान मदरशात आज मोठ्या जलशाचे आयोजन.
तीस मुलांना दिली जाणार कुराण शरीफ हिफ्ज ची सनद .
पंचेविस वर्षांनंतर घेतला जातोय जलसा.
औसा. शहरालगत असलेल्या लातूर औसा हायवे जवळील आरबी मदरशात दिनांक 18 वार रविवार म्हणजे आज 5.00 वाजता मोठ्या जलशाचे आयोजन करण्यात आले आहे.या जलशामध्ये तीस मुलांना कुराण शरीफ पाठांतर म्हणजे हीफ्ज केल्याची सनद देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला या संस्थेचे प्रमुख स्वर्गीय गुलाम वस्तानवी यांचे चिरंजीव मौलाना हुजेफा यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.तालुक्यात या जलशाची मोठी चर्चा आहे. या जलशाला तालुक्यातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत.मुस्लिम महिलांची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी या जलसासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे.उपस्थित वर्गाचे खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील विद्यमान उपनगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,शकील शेख,अजहर हाश्मी ,रहमत पाटेल,युनूस खान,शेख जावेद,शेख मुजाहेद,हयात खान, फुरकान सय्यद, महेबुब वकील साहेब,बादेला,आदी व्यक्तींनी या कार्यासाठी भरघोस अशी आर्थिक मदत केली आहे. शहरातील सर्व मान्यवरांनी व मदरश्याचे नाजीम आमीर शेख तसेच शहरातील उलेमांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


0 Comments