सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर चरित्र निर्माण करणार्‍या पवित्र कुराण चे अनुकरण करा." मौलाना हुजेफा वस्तानवी

 "सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर चरित्र निर्माण करणार्‍या पवित्र कुराण चे अनुकरण करा."

मौलाना हुजेफा वस्तानवी










बी जी शेख.


औसा. आयुष्य जगण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचे नाही तर सुंदर चरित्र असणे महत्त्वाचे आहे व ते सुंदर चरित्र कुराण च्या आचरणाने प्रत्येकात येईल असा उपदेश मौलाना हुसेफा वस्तानवी यांनी जमलेल्या समुदायास संबोधित करताना व्यक्त केले.



    शहरात तक्वियतूल इमान या मदरशात ता.१८ वार रविवार रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या जलशाचे आयोजन करण्यात आले होते.या

मदरशात ३० विद्यार्थ्यांना कुराण पठणाची सनद देण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यात ते बोलत होते.



    पुढे बोलताना मौलाना म्हणाले की आयुष्य जगत असताना इतरांना त्रास होणार नाही असे जीवन जगा,आपल्या आई-वडिलांची सेवा करा, आपल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण देण्याबरोबरच योग्य आचरणाचे शिक्षण ही देणे महत्त्वाचे आहे.या भौतिक सुविधांकडे वळणाऱ्या जगात मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा.त्यांच्या शिक्षणाची काळजी घ्या. भारी मोबाईल घेण्यापेक्षा चांगले शिक्षण देण्याकडे लक्ष द्या.अशा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.



    👉ज्या मुलांना कुराण चे पठण शिकवले अशा एका पायाने अपंग शिक्षकास यावेळी विद्यार्थ्यांनी एक टू व्हीलर गाडी सप्रेम भेट दिली.

        


या जलशाला तालुक्यातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.मुस्लिम महिलांची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी या जलसासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.उपस्थित वर्गाचे खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती.



 शहरातील विद्यमान उपनगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,शकील शेख,अजहर हाश्मी ,रहमत पाटेल,युनूस खान,शेख जावेद,शेख मुजाहेद,हयात खान, फुरकान सय्यद, महेबुब वकील साहेब,बादेला,आदी व्यक्तींनी या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.शहरातील सर्व मान्यवरांनी व मदरश्याचे नाजीम आमीर शेख तसेच शहरातील उलेमांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.



  शहरासह ग्रामीण भागातील हजारो मुस्लिम बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी मदरशाचे नाजीम शेख अमीर यांनी मदत करणाऱ्यांचे व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments