महाराष्ट्राचा कोहिनूर पडद्याआड…*

 *महाराष्ट्राचा कोहिनूर पडद्याआड…*





स्वप्न अधांतरी राहिले…

दादा असं कसं सोडून गेले…

हसऱ्या चेहऱ्यामागे संघर्षांचा डोंगर,

कामाचा धडाका, न थांबणारा झंझावात होता.

सामान्यांच्या वेदनांना आवाज देणारा,

सर्वहारांसाठी आधारवडाचा हात होता…


स्वप्न अधांतरी राहिले…

दादा असं कसं सोडून गेले…


रस्त्यावरच्या माणसाच्या डोळ्यांत

त्यांना स्वतःचं भविष्य दिसायचं,

सत्तेपेक्षा माणुसकी मोठी मानणारा

नेता पुन्हा कुठे मिळायचा?

स्वप्न अधांतरी राहिले…

दादा असं कसं सोडून गेले…


शरीर गेले, पण विचार जिवंत आहेत,

लढ्याची मशाल आजही पेटलेली आहे.

दादा, तुमचं स्वप्न अपूर्ण असलं

तरी ते पूर्ण करणारी पिढी

तुम्हीच घडवून ठेवली आहे…


दादा, तुमचं जाणं

संपूर्ण राज्याची मोठी हानी आहे…

तुमच्यासारखा नेता

पुन्हा होणं नाही…


भावपूर्ण आदरांजली… 🌹


- बशीर शेख "कलमवाला"






Post a Comment

0 Comments