रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे* *किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम*

 *रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे* 

*किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम*



 


सोलापूर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत कार्यरत रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्यावतीने “किशोरवयीन विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण : मासिक आरोग्य शिक्षणाद्वारे” या विषयावर आधारित हा कार्यक्रम सदगुरूअण्णा माऊली माध्यमिक विद्यालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. किरण सारडा यांनी सर्व विद्यार्थिनींना याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुजारी उपस्थित होते. यावेळी आशा वर्कर पिसके मॅडम, बोराडे मॅडम तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुहास भोसले, सुवर्णा राजेंद्र शिंदेसह शाळेतील शिक्षक आतकरे, काळेर, तांबोळी, राऊत, माने मॅडम, खरात उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. किरण सारडा यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांना मासिक पाळीविषयी शास्त्रीय, सोप्या व संवेदनशील पद्धतीने मार्गदर्शन केले. मासिक स्वच्छता, आरोग्यदायी सवयी, आहार तसेच मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला.



या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय रोटे. स्वाती मन्सावले यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्यजागरूकतेस चालना मिळेल, असे मत रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे सचिव रोटे. बसवराज बिराजदार यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments