​सुलतान अख्तर यांच्या  'उर्दू के मुसाफिर' या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन




​सोलापूर

भारतीय उर्दू विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष,  आणि उर्दू कथाकार सुलतान अख्तर यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या साहित्यिक प्रवासावर आधारित 'उर्दू के मुसाफिर' या तिसऱ्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. प्रसिद्ध साहित्यिक आणि लेखक श. शकील यांनी हे महत्त्वपूर्ण पुस्तक अत्यंत परिश्रम आणि निष्ठेने संपादित केले आहे.

​विशेष म्हणजे, सुलतान अख्तर यांच्या साहित्यिक कार्यावर आधारित हे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी तरुण समीक्षक गुलाम साकिब (बीड) यांनी त्यांच्यावर पहिले पुस्तक लिहिले होते, त्यानंतर ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक अर्शद सिद्दीकी यांनी 'हर्फ हर्फ पैरहन' नावाचे दुसरे पुस्तक संपादित केले होते. आता शिन शकील यांनी संपादित केलेले हे तिसरे पुस्तक सुलतान अख्तर यांच्या साहित्यातील वाढती लोकप्रियता आणि त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचा पुरावा आहे.

​ सुलतान अख्तर यांनी हे नवीन पुस्तक ज्येष्ठ पत्रकार व उर्दू मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्युब अहमद नलामंदू, व रोटरी क्लबचे इक्बाल बागवान आणि ज्येष्ठ शिक्षक मोहम्मद हुसेन तांबोळी यांना त्यांच्या निवासस्थानी भेट दिले. याप्रसंगी अय्युब नलामंदू यांनी सुलतान अख्तर आणि संपादक शिन  शकील यांचे अभिनंदन करत आपले विचार व्यक्त करताना. सुलतान अख्तर हे अत्यंत क्रियाशील व्यक्तिमत्त्व असून प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे उर्दू भाषा आणि साहित्याची सेवा करण्यावर त्यांचा विश्वास ठेरणारे व्यक्ती आहेत अशी प्रशंसा केले तसेच शिन शकील यांनी हे पुस्तक संपादित करून एक महत्त्वाची साहित्यिक गरज पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले.

​इक्बाल बागवान आणि मोहम्मद हुसेन तांबोळी यांनीही सुलतान अख्तर याच्या पुढील कार्यास व .

 वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुलतान अख्तर यांनी सर्व मित्रांचे आभार मानले आणि आपले साहित्यिक व पत्रकारितेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा इच्छा जाहिर केली

Post a Comment

0 Comments