लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया अधिक गडद...*शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा*..

 लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया अधिक गडद...*शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा*..




लातूर जिल्ह्यावर वरचेवर दुष्काळाची छाया अधिक गडद होत असून यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पाऊस हुलकावणी देत अल्याने शेतातील पिके वाया गेली असून शेतकऱ्यांना शेतातील अनेक पिकावर रोटर फिरवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ओढे,नाले,तलाव कोरडे ठाक पडले असून विहीर आणि बोअरचे पाणी कमी झाले आहे.आता परतीच्या पावसाने दडी दिल्यास शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याची अवस्था याहीपेक्षा अधिक बिकट होणार आहे,रब्बीच्या पेरणीचा तर विषयच संपला. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात शेती आणि शेतकऱ्याची परिस्थिती एवढी गंभीर असताना या विषयावर सरकार दरबारी कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. काही लोकप्रतिनिधी पिकाच्या पाहणीची नौटंकी करत असल्याचे दिसून येत आहे.परंतु याने काही होणार नाही.उलट ते आगीत तेल ओतल्यासारखे आहे,आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या काही उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याची शासनाने तात्काळ सुरुवात करून येणारी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात लातूर सारख्या ठिकाणी घेण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या सरकारवर दबाव आणून त्यांना बैठक घेऊन तात्काळ उपायोजना करण्यासाठी भाग पाडावे.ऐन पावसाळ्यात पाण्याचे असे दुर्भिक्ष निर्माण होत असेल तर भविष्यात इथे काय परिस्थिती होईल याची कल्पना न केलेली बरी. वास्तविक मराठवाड्याची शेती,शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या उपलब्धतेची जोडलेली आहे.अनियमित पाऊस,भूजलावरील वाढता ताण आणि बदलते हवामान, एल निनोचा प्रभाव यामुळे जलसंधारण आता केवळ विकासाचा विषय राहिला नाही तर मराठवाड्याच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत भविष्यासाठीची गरज बनली आहे.त्यामुळे सरकारने पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे,जमिनीत मुरवने,भूजल पुनर्भरण वाढविणे,स्थानिक जलस्त्रोतांचे पुनर्जीवन करणे,मातीची धूप थांबवणे तसेच मराठवाड्यात विशेषतः लातूर जिल्ह्यात आणि औसा तालुक्यात मृदू व जलसंधारणसह जलयुक्त शिवार व वृक्ष लागवड आणि संगोपनाची कामे तात्काळ हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे.विशेष म्हणजे सार्वजनिक जलस्त्रोत उदाहरणात सिंचन, पाझर,साठवण तलावावरील होत असलेला पाणी उपसा (मग तो वैद्य असो वा अवैद्य) तात्काळ बंद करून जिल्ह्यात सुरू असलेली सरकारी व वैयक्तिक बांधकामे थांबवण्याचेही आदेश त्वरित द्यावेत.तसेच जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना,शेतमजुरांना व शेतीशी निगडित घटकांना आपत्कालीन परिस्थितीत ज्या काही मदती पुरवण्याची तरतूद आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवकुमार नागराळे यानी केली आहे 

      




Post a Comment

0 Comments