देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करून शिक्षणक्षेत्रात बहुमोल योगदान दिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि ऐकतेसाठी ते झटले. त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
---------------------- --------------------------------------
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद (र.अ.) यांनी स्वतंत्रता चळवळीत 10 वर्षे, सात महिने तुरूंगात घालविले.मौलाना आझाद (र.अ.)यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'(आयआयटी) आणि 'युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन' (यूजीसी) ची स्थापना केली होती भारतीय राष्ट्रीय चळवळीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मौलाना अबुल कलाम आझाद (र.अ.)यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का येथे झाला. त्याचे वडील मौलाना खैरुद्दीन (र.अ.)आणि आई आलिया होते.वडील त्या काळचे फार मोठे आलीम ए दिन व सुफी संत होते. तसेच आजोबा मोहम्मद हादी (र.अ.) दिल्लीचे नामांकित आलीम ए दिन, व संत प्रवृत्ती चे व्यक्तिमत्त्व होते मौलाना आझाद(र.अ.)चे मूळ नाव अबुल कलाम मोहद्दीन खैरुद्दीन असे होते. ते अरबी, पर्शियन, तुर्की आणि उर्दू भाषांचे एक महान विद्वान होते.
'दरसे निजामी' हा दहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी अवघ्या चार वर्षात पूर्ण केला यावरून
त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची प्रचिती येते.
१८९९ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी इमाम गझालींचे चरित्र लिहायला सुरूवात केली. १९०१ साली त्यांनी ताझकिरा ए-सादिका या मौलवी अब्दुल रहीम यांच्या 'अंदमानचा कैदी' या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. आझाद यांचे वय लहान असूनही लेखक म्हणून त्यांच्या विषयीच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या, हेच यावरून स्पष्ट होते, खासगी आणि सार्वजनिक सभांतून भाषणे करायला त्यांनी १९०१ पासूनच प्रारंभ केलेला होता. त्यांचे वक्तृत्व तेव्हापासूनचश्रोत्यांना भारावून टाकू लागले होते.ह्यानंतर त्यांना दीनी तालीम साठी 1905 मध्ये जामिया अजहर काहिरा येथे पाठवण्यात आले खिलाफत आणि असहकार चळवळीत अत्यंत सक्रियपणे भाग घेत त्यांनी राष्ट्रीय चळवळीत प्रवेश केला.परकीय नियमांविरूद्ध लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि ‘अल हिलाल’, ‘अल बलाग’ आणि इतर अनेक उर्दू मासिके प्रकाशित केली.त्यांच्या मासिकांवर ब्रिटिश सरकारने बर्याच वेळा बंदी घातली होती.
भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या काळात त्यांनी 10 वर्षे आणि सात महिने देशाच्या वेगवेगळ्या तुरूंगात जीवन व्यतीत केले. मार्च १९२१ मध्ये मौलाना आझाद यांनी तिसऱ्यांदा गांधीजींबरोबर पंजाबचा दौरा केला. त्यावेळी लाहोर आणि अमृतसर येथे सार्वजनिक सभांना बंदी होती. गांधीजींनी मौलानांच्या दृष्टिकोनाला पाठिंबा दिला. शुक्रवारच्या खुतबा नंतर मौलानांनी शाही मशिदीत अंतःकरण हेलावून सोडणारे भाषण केले.
एका आठवड्यानंतर मौलाना आझाद अमृतसराला पोहोचले. तेथे त्यांनी इंग्रज राजवटी विरोधातआणखी एक प्रक्षोभक भाषण केले.२५-२६ जून १९२१ ला बिहारच्या जमियत उल्-उलेमा चे अधिवेशन मौलाना आझाद(र.अ.) च्या अध्यक्षतेखाली पार पडले. बिहार ओरिसातून जवळजवळ.तीनशे उलेमा हजर होते.२५ ऑगस्ट १९२१ ला आग्रा येथे झालेल्या मजालिस- ए-खिलाफत च्या अध्यक्षपदावरून मौलाना आझाद (र.अ.)यांनी आपले 'भाषण वाचले. धर्म आणि कुरआन या विषयीची त्यांची सहानभूती, त्यांचे राजकीय आकलन, त्यांच्या ब्रिटिश विरोधी भावना, त्यांचे हिंदू-मुस्लिम ऐक्यासंबंधीचे विचार आणि त्यांची तीव्र स्वातंत्र्यकांक्षा यांचे प्रतिबिंब त्यात पडले असल्याने ते भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे.1923 मध्ये दिल्लीत झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनां मध्ये ते अध्यक्ष झाले तेव्हा ते 35 वर्ष वयाचे होते. 1927 मध्ये मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल कॉंग्रेस यांच्यात झालेल्या करारामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1939 मध्ये ते पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 1948 पर्यंत ते त्या पदावर राहिले.त्यांनी फुटीरतावादी विचारसरणीचा तीव्र विरोध केला आणि जाहीर केले की देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सुसंवाद असणे महत्त्वाचे होते.
मौलाना आझाद (र.अ.)यांच्या अध्यक्षतेखाली 1942 मध्ये, इंडियन नॅशनल कॉंग्रेसचे मुंबई येथे अधिवेशन झाले. तेव्हा त्यांची पत्नी खूप आजारी होती. नंतर, जेव्हा मौलाना आझाद (र.अ.)ला अटक करण्यात आली आणि अहमदनगर किल्ल्यात तुरुंगात टाकण्यात आले, त्याच वेळी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. मौलाना आझाद (र.अ.)यांनी स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या कौटुंबिक जीवनाच्या स्तरावर केलेले बलिदान,ते आम्हाला बर्याचदा आठवत नाहीत.हे दुर्दैव आहे
स्वातंत्र्यानंतर ते पहिले शिक्षणमंत्री झाले आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्जनशील व विधायक कार्यक्रम व योजना राबवल्या.मौलाना आझाद यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'(आयआयटी) आणि 'युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन' (यूजीसी) ची स्थापना केली होती.याद्वारे त्यांनी शिक्षण आणि संस्कृती विकसित करण्यासाठी उत्कृष्ट संस्था स्थापन केल्या. त्यांनी संगीत नाटक अकादमी (1953), साहित्य अकादमी ( 1954) आणि ललित कला अकादमी (1954) ची स्थापना केली.
वैज्ञानिक शिक्षणाचीही मौलानांना तितकीच काळजी होती. म्हणून डॉ.शांती स्वरुप भटनागर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक समिती गठित केली.
वैज्ञानिक क्षेत्रात असाधारण बुध्दिमत्ता दाखविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे तिचा हेतू होता. त्यांना शक्य तेवढे सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यात यावे, असे ह्या मौलानांना वाटे.अशा रीतीने वैज्ञानिक आणि तांत्रिक संघटना निर्माण करण्यात मौलानांना यश आले. आज या संघटना अत्यंत कार्यक्षमतेने कार्य करीत आहेत.ह्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगात आपला देश इतर अनेक देशांच्या तुलनेत पुढे चालला आहे, याचे श्रेय ह्या संस्थांना आहे.शैक्षणिक प्रशासन आणि संशोधन क्षेत्रातील सुधारणा घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.१९ फेब्रुवारी सकाळी मौलानांना हृदयविकाराचा झटका आला.थोड्याच वेळात त्यांच्या आजारपणाची बातमी देशभर पसरली. तीन दिवस मौलाना आझाद (र.अ.)अर्धवट शुध्दित होते. एकदा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा पंडित नेहरु त्यांच्या जवळ होते. मौलाना म्हणाले. "बरयं येतो"
कलकत्त्याचे डॉ. बिधनचंद्र रॉय यांच्यासह सर्वोत्तम डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. २२ फेब्रुवारी १९५८ रोजी पहाटे २-१५ वाजता मौलाना इहलोक सोडून गेले. दुपारी १ वाजता हजारो शोकग्रस्तांनी मौलानांचे
पार्थिव जामा मशिद आणि लाल किल्ला यांच्या दरम्यानच्या खुल्या मैदानावर नेले. नमाज-ए-जनाजाला जवळ जवळ दोन लाख लोक होते. त्यांच्या पसंतीच्या मैदानावर मृत देहाच्या अवशेषांचे दफन केल्यावर लोक परतले, ते कधीही भरुन न येणाऱ्या हानीची भावना घेऊनच.
1992 मध्ये अबुल कलाम आझाद(र.अ.)यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना नेहमी साधेपणाचे आयुष्य आवडत असे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्या काळात त्याच्याकडे कोणतीही संपत्ती किंवा बँक खाते नव्हते. त्यांच्या वैयक्तिक वॉर्डरोबमध्ये काही सूती अचकन, एक डझन खादी कुर्ता पायजामा, दोन जोड्या सँडल, जुने ड्रेसिंग गाऊन आणि वापरलेले ब्रश सापडले, परंतु अशी अनेक दुर्मिळ पुस्तके होती जी आता देशाची मालमत्ता आहेत.
त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यांनी केलेल्या कार्याला शब्दबद्ध करणे शक्य नाही,देश सदैव आपल्या त्याग बलिदान साठी ऋणी राहील.
संदर्भ-1) THE IMMORTALS
--- sayed naseer ahamed
2 ) मौलाना अबुल कलाम आझाद - अब्दुल देसनवी
अनुवादक तथा संकलक लेखक - *अताउल्ला खा रफिक खा पठाण सर टूनकी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र*

0 Comments