पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांची धावपळ

 पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांची धावपळ











 औसा प्रतिनिधी 


औसा तालुक्यामध्ये परतीच्या पावसाच्या पुनरागमनामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. हवामान खात्याने दि 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी औसा शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात मूग उडीद आणि सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला असून आणखी पाच दिवस पाऊस राहणार असल्यामुळे कापणीसाठी आलेले सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता पारतीचा पाऊस उघडेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षी हवामान खात्याने वर्तविलेले पावसाचे अंदाज तंतोतंत खरे ठरत असल्यामुळे शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली आहे. शेतात सध्या सोयाबीन कापणीचा हंगाम जोरात सुरू असून सर्वसाधारण प्रतीच्या जमिनीतील मृग नक्षत्रामध्ये पेरणी झालेले सोयाबीन कापणीसाठी आले आहेत.तसेच शेंगा वाळल्यामुळे पावसाच्या आगमनामुळे काढणीसाठी आलेले पीक भिजण्याची शक्यता आहेत. म्हणून शेतकरी सोयाबीन काढून गंजी लावून सोयाबीनचे काढ झाकून ठेवण्याच्या तयारीला लागला आहे. शेतकरी त्यासाठीच चवाळे ताडपत्री  व इतर साहित्याची खरेदी करून साहित्याची जुळवाजुळव करीत आहेत.



Post a Comment

0 Comments