जड वाहतुकी विरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केले आंदोलन

 जड वाहतुकी विरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केले आंदोलन 





सोलापूर( प्रतिनिधी) सोलापूर शहरातील जड वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे जड वाहातुकीवर जिल्ह्या प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणतीच कारवाई करण्यात येत नाही याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी कायदे केले पण त्या कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नाही त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे आहे पण कुठेतरी कर्तव्यात कसूर प्रशासनाकडून होत आहे त्यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते डोळ्यावर काळी पट्टी बांधून व हातात विविध घोषवाक्याचे फलक घेऊन जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ घोषणा देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला  जड वाहतूक दिवसा पुर्णबंद करावी बाह्य वळण रस्ता रिंग रोड तात्काळ पूर्ण करावे अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष

 श्याम कदम संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके संघटक दत्ता जाधव जिल्हा संघटक रमेश जाधव रमेश चव्हाण सागर राठोड शाहरुख पटेल अजित पाटील उमेश जाधव तेजस गायकवाड अमोल सलगर तेजस शेळके पिल्लू पवार इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments