उर्दू ही गंगा जमनी संस्कृतीची निशानी : शर्मा*

 

उर्दू ही गंगा जमनी संस्कृतीची निशानी : शर्मा*





सोलापूर- 'उर्दू ही देशाला एका माळ्यात पुरविण्यासाठी उत्कृष्ट साधन आहे व या भाषेने स्वातंत्र्य लढ्यात उत्कृष्ट कार्य केले आहे', असे उद्गार सुप्रिध्द उद्योगपती व उर्दू प्रेमी अरुण शर्मा यांनी काढले. खादिमाने उर्दू फोरम सोलापूरच्या आठवे अशर-ए-उर्दू २०२३ चे उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

यावेळी अशर-ए-उर्दूचा उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी दर वर्षीप्रमाणे उर्दूत्तर भाषिकांसाठी मोफत उर्दू वर्गाचे उद्घाटन सुध्दा करण्यात आले. त्यात ५५ लोकांनी आपले नांव नोंदविलेले आहे आणि या वर्षी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही प्रकारचे वर्ग घेण्यात येतील.

आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, भाषेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणे हे खादिमाने उर्दू फोरम सोलापूरचा वैशिष्ट्य आहे. भाषेमार्फत लोकांचे नाते जोडणे व हृदय जुळविणे हे कार्य ही फोरम अत्यंत कुशलतेने करत आहे. प्रास्ताविकात अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी सांगितले की, उर्दू भाषा ही कोणा एका समुदाय व धर्माची भाषा नसून शुध्द हिंदुस्थानी भाषा आहे व या भाषेचा प्रचार देशात एकता सदृढ करू शकतो. 

सचिव अ. मन्नान शेख यांनी संस्थेच्या कार्याचा तपशील करताना सांगितले की, दर वर्षी उर्दू देशप्रेमी गीत स्पर्धा आयोजित होते व या वर्षीचा प्रथम पुरस्कार हरीभाई देवकरण शाळेनी जिंकला.  उर्दू देशप्रेमी गीत स्पर्धेत मराठी माध्यम शाळेनी पुरस्कार जिंकणे हे राष्ट्रीय एकात्मतेचे चिन्हे आहेत.  खजिनदार नासिरोद्दीन आळंदकर यांच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.  याप्रसंगी डॉ. सतीश वळसंगकर ज्यांनी उर्दू भाषा या वर्गातच शिकली आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात निवृत्त मुख्याध्यापक खलील शेख यांनी सांगितले की, बहुभाषिक वातावरण देशासाठी पोशक असून माणसानी स्वत:चा व्यक्तिमत्व उंच करण्यासाठी अनेक भाषा शिकले पाहिजे. 

कार्यक्रमात समन्वयक रफीक खान, अलीमोद्दीन दंडोती व संचालक अन्वर कमिशनर, डॉ. अ. रशीद शेख, मुज्जमील शेख, इम्रान अलमेलकर, बशीर बागवान, अ. हमीद दाळींबवाले आदी उपस्थित होते.  शेवटी संयोजक म. इक्बाल बागबान यांनी आभार मानले.

 


Post a Comment

0 Comments