20 वर्षानंतर लागला भादा- संमदर्गा रस्ता डांबरीकरणास मुहूर्त ; क्वालिटीचे काम करण्याची मागणी
.
औसा -औसा तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या गावामध्ये गणल्या जाणारे भादा हे गाव.या गावासाठी गेल्या 20 वर्षापासून औसा ते भादा हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत होता आणि भादा जिल्हा परिषद सदस्य निवडून देण्यासाठी त्या उमेदवारासाठी मोठ्या प्रमाणात लकी ठरलेला आहे.
कारण याच मतदारसंघातून निवडून गेलेले जिल्हा परिषद सदस्य हे सभापती,जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि दांडगे विकासक असून जिल्ह्याचा रस्ते मार्ग विकास करण्यासाठी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या जिव्हाळ्याचे असतात अशी चर्चा सध्या औसा तालुक्यातील भादा परिसरामध्ये होत आहे.
तर गेल्या 20 वर्षापासून ना घर का न घाट का? या स्थितीमध्ये सापडला असून या रस्त्याचे वाईट दिवस संपतील अशी शक्यता सध्याच्या मंजूर असलेल्या विकास कामावरून वाटते.
कारण भादा येथे असलेला चाळीस वर्षांपूर्वी बनलेला पूल सध्या त्याचे काम प्रगतीपथावर असून या पुलावर पाणी आल्यानंतर दोन दोन ते चार चार दिवस भादा पासून पुढील गावांचा संपर्क तुटत होता. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असे.याकरिता या भागातील नागरिक जि प सदस्य,आमदार, खासदार यांच्याकडे वारंवार जाऊनही यावर कोणताही निर्णय होत नव्हता असे दिसून येत होते परंतु सध्या लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख आणि या भागाचे प्रतिनिधीत्व केलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या प्रयत्नातून भादा ते संमदर्गा मोड हा 7 किमी चा रस्ता हा रस्ता काम शनिवार दि 28 जानेवारी 2023 रोजी समदर्गा ते भादा सुरू असल्याने आणि भादा ते शिंदेवाडी - उटी 5 किमी रस्ता मंजूर झाल्याची चर्चा आहे.
परंतु सध्या काम सुरू असलेल्या संमदर्गा मोड - भादा रस्त्याची प्रतवारी व्यवस्थित नसल्याची चर्चा नागरिकात असून याकडे संबंधित अभियंता आणि या भागाचे प्रतिनिधी जे स्थानिक स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत आहेत या सर्वांनी या बाबीकडे लक्ष द्यावे आणि गेल्या अनेक वर्षापासून खराब आवस्थेत पडलेला हा रस्ता सुस्थितीत येत आहे तो अगदी व्यवस्थितपणे प्रतवारी तपासून बनवून घ्यावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

0 Comments