वाढदिवस आणि जयंती निमित्त रुग्णांना साडीसह फळे वाटप

 वाढदिवस आणि जयंती निमित्त रुग्णांना साडीसह फळे वाटप 






औसा: तालुक्यातील भादा येथील भाजपा कार्यकर्ते यांच्याकडून आमदार रमेश कराड यांचा वाढदिवस आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भादा तालुका औसा येथील भाजप कार्यकर्ते यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथील कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना साडी आणि फळे वाटप करण्यात आले.

आमदार रमेश कराड आणि अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भादा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महेश पवार यांनी माहिती दिली आणि या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भादा ग्रामपंचायत सदस्य सत्यशीला बनसोडे,राधा माळी याही उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश लटूरे यांनी केले

तर उपस्थितांचे आभार बालाजी उबाळे यांनी मांनले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी आणि भादा तालुका औसा येथील भाजपाचे कार्यकर्ते पांडुरंग बनसोडे, सतीश कात्रे, बालाजी डोलारे, संजय बनसोडे, व्हा चेअरमन महेश गायकवाड,बाबुराव आगलावे आदी सह अनेक नागरिक उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments