केंद्रीयमंत्री नितिन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त...... औशात वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हरित बंधारे समृद्ध शेतकरी अभियान...उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना मिळणार लाखो रुपयांचा विकासनिधी....

 केंद्रीयमंत्री नितिन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त...... 






औशात वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हरित बंधारे समृद्ध शेतकरी अभियान.... 









उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना मिळणार लाखो रुपयांचा विकासनिधी.... 





औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनापासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनापर्यंत औसा मतदारसंघात वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हरित बंधारे समृद्ध शेतकरी हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार असून या अभियानातून १० हजार हेक्टर कृषी क्षेत्राच्या बांधावर फळबाग लागवडीची उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे अभियान गावांच्या लोकसंख्येनुसार तीन टप्प्यात विभागून घेतले जाईल यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना लाखो रुपयांच्या विकासनिधीची घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. 


             २७ मे हा देशाचे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचा जन्मदिवस तर २२ जुलै हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस. दोन्ही विकासाभिमुख नेत्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २७ मे, २०२३ ते २२ जुलै, २०२३ दरम्यान औसा मतदारसंघात "वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज हरित बंधारे समृद्ध शेतकरी" हे स्पर्धात्मक अभियान पूर्ण ताकतीने राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मोठ्या लोकसंख्येची गावे, मध्यम लोकसंख्येची गावे आणि कमी लोकसंख्येची गावे असे ३ टप्पे करण्यात आले आहेत. तिन्ही टप्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या २-२ गावांना बक्षिसस्वरुपात विकासनिधी दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रत्यक्षात झालेली लागवड गृहीत धरून १ जानेवारी, २०२४ रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे. मतदारसंघातील गावांमध्ये विकासाची स्पर्धा निर्माण करायची आणि स्पर्धेतून विकास साधायचा असे धोरण या स्पर्धेमागे आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांचा समावेश असलेली गावनिहाय अंमलबजावणी टीम गठीत केली जाणार असून तिन्ही टप्यांमधील विजेत्या व उपविजेत्या टीम्सच्या सदस्यांना क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने वैयक्तिक स्वरूपाची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.



                      या अभियानाची अंमलबजावणी औसा मतदारसंघातील प्रत्येक गाव,वाडी, वस्ती व तांड्यावर केली जाईल.१० हजार हेक्टर कृषीक्षेत्राच्या बांधावर फळबाग लागवड करण्याचे महत्वकांक्षी उद्दिष्ट असेल.यासाठी स्पर्धा २७ मे, २०२३ ते २२ जून, २०२३ दरम्यान ३ टप्यांमध्ये पार पडेल.प्रत्येक टप्पा १५ दिवसांचा असेल.२३ जून ते ३० नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्षात वृक्षलागवड केली जाईल.मोठा गट (टप्पा १): विजेत्या गावाला ४० लक्ष रु. विकासनिधी तर उपविजेत्या गावाला ३० लक्ष रु. विकासनिधी. क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने विजेत्या अंमलबजावणी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी २५,०००/- रु. आणि उपविजेत्या अंमलबजावणी संघातील प्रत्येक सदस्याला २१,०००/- रु. बक्षीस.मध्यम गट (टप्पा २): विजेत्या गावाला ३० लक्ष रु. विकासनिधी तर उपविजेत्या गावाला २० लक्ष रु. विकासनिधी. क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने विजेत्या अंमलबजावणी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी २१,०००/- रु. आणि उपविजेत्या अंमलबजावणी संघातील प्रत्येक सदस्याला १५,०००/- रु. बक्षीस.छोटा गट (टप्पा ३): विजेत्या गावाला २० लक्ष रु. विकासनिधी तर उपविजेत्या गावाला १५ लक्ष रु. विकासनिधी. क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने विजेत्या अंमलबजावणी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी १५,०००/- रु. आणि उपविजेत्या अंमलबजावणी संघातील प्रत्येक सदस्याला ११,०००/- रु. बक्षीस दिले जाईल. 


............... 


दोन्ही नेत्यांना विकासात्मक शुभेच्छा देण्यासाठी अभियानाची सुरुवात - आ. अभिमन्यू पवार 




विकासाची स्पर्धा निर्माण होईल आणि स्पर्धेतून विकास साधला जाईल.फळझाड लागवड व संगोपनासाठी शेतकऱ्यांना मनरेगातून अनुदान मिळेल.शेतकऱ्यांना शाश्वत आणि अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल.निसर्गपूरक विकासाला चालना मिळेल नितीनजी गडकरी व देवेंद्रजी फडणवीस हे सतत विकासाचा ध्यास असलेले नेते आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांनाही विकासात्मक शुभेच्छा देण्याचा माझा आणि औसा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.









Post a Comment

0 Comments