हल्लेखोरांवर लवकरात लवकर अटक करुन कार्यवाही करावी- वंचित बहुजन आघाडीची मागणी औसा तहसीलदार यांना निवेदन

 हल्लेखोरांवर लवकरात लवकर अटक करुन कार्यवाही करावी- वंचित बहुजन  आघाडीची मागणी  औसा तहसीलदार यांना निवेदन


औसा- मुखतार मणियार 






 वंचित बहुजन युवा मुंबई प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशूर तसेच सुप्रसिद्ध गायक गौतम हराळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करुन कायदेशीर कार्यवाही करावी. यासाठी आज वंचित बहुजन महिला आघाडी औसा तालुकेच्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे दि.27/05/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ध् आ. प्रकाश  तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई मध्ये मोठ्याप्रमानात सभा होत आहेत,त्या अनुषंगाने दि. 03/06/23 रोजीच्या कुर्ला येथील सभेचे नियोजन करण्यासाठी आंबेडकर भवण दादर येथे युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी जमा होत आसताना सायंकाळी 6:30 ते 7:00 वाजेच्या दरम्यान मुंबई प्रदेश युवा आघाडी चे आध्यक्ष श्री परमेश्वर रणशुर व वार्ड क्र.131 अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर काही अद्न्यात हल्लेखोरानी तलवार,चॉपर, लोखंडी रॉड यानी प्राणघातक हल्ला केला आहे.त्यानिमित्ताने आज औसा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतिने औसा ताहसिलदार याना वरील हाल्लेखोरावर लवकरात लवकर अटक करुन कार्यवाही करण्यात यावी व जर कार्यवाही नाही झाली तर पुढील  उदभ्वना-या परिस्थितीची जबादारी ही शासनाची राहील असे  निवेदनात नमूद केले आहे. 

 यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे औसा तालुकाध्यक्ष श्री शिवरूद्र बेरुळे (आप्पा) तालुका महासचिव श्रावण कांबळे, औसा शहराध्यक्ष श्री ईलयास चौधरी, वंचित बहुजन महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.छायाताई खरात,महिला तालुका उपाध्यक्ष सौ.आरती गायकवाड, तालुका युवा उपाध्यक्ष श्री आदेश तथा सागर आडसुळे, तसेच निखिलभाऊ आडसुळे, दात्तु खरात,राजेंद्र कांबळे व अनेक कार्यकर्ते हजर होते.









Post a Comment

0 Comments